9.3 C
New York
Saturday, April 25, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️समाज रत्न गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

🔴 समाज रत्न गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात साजरा. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव

मानेगाव दिनांक १०/१/२०२५ रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन त्यांचे कडून सामाजिक कार्यक्षेत्रात अग्रेसर असलेले व्यक्ती त्यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये मानेगाव जहांगीर या छोट्या ग्रामीण गावात राहणारी जालना जिल्हा सौ. कांचन शिरभे यांना ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन च्या वतीने सौ. कांचन राजू शिरभे ताई यांना सामाजिक राजकीय अभिनेत्री पुरस्कार जाहीर बॉलिवूड अभिनेत्री सौ. चित्रा दिक्षित मॅडम व पुरस्कार समिती उपाध्यक्ष सौ. वंदना गव्हाणे मॅडम समिती अध्यक्ष श्री सुदाम संसारे यांच्या हस्ते कमल शांती हॉटेल शिर्डी येथे १० जानेवारी २०२५ रोजी पुरस्कार देण्यात आले. 

यावेळी डॉ. श्री अजय वारूळे सल्लागार सोहळा समिती, श्री संजय मोरे, श्री राजेश काळे, श्री संभाजी खैरे श्री पांडुरंग डोंगरे, सौ. अनुष्का गुरव, श्री अशोक सुर्यवंशी यांची उपस्थिती होती अमरावती उपेक्षित नाईकचे मुख्य संपादक श्री भूषणनी सरदार, संपूर्ण उपेक्षित नायकचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिवगर्जना न्यूज, नाशिक जिल्हा प्रतिनिधी डॉ. शाम जाधव यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती. हा कार्यक्रम अगदी डोळे भरून पाहण्यासारखा संपूर्ण शिर्डी संस्थान शहरांमध्ये गाजावाजा करीत आलेल्या मान्यवरांची व्यवस्थित व्यवस्था केली असल्याने कुठलेही गालबोट या कार्यक्रमास लागलेले नाही. पारितोषिक समारंभ अगदी उत्साहात संपन्न झाला. 

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या