🔴 नांदेडमध्ये व्यंकटराव पा. गोजेगाकर सह प्रमुख ११ पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी
शिवसेना गटाचे माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास प्रमुख ११ पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला. आमदार प्रतापराव पाटील – चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यामुळे नांदेड जिल्ह्यात ठाकरे गटाला गळती लागली. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख निवडीनंतर माधव पावडे यांना पदावरून काढण्यात आले होते.
यावेळी मा. जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर व अविनाश घाटे यांची माजी आमदार जिल्हा संघटक नेताजी भोसले, महानगरप्रमुख प्रदीप उर्फ पप्पू जाधव, तालुकाप्रमुख गणेश शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, माजी जि.प. सदस्य साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी, युवासेना शहरप्रमुख अभिजीत भालके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞
(9923072242)