20.7 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️ईय्यता ९ वीत शिकणाऱ्या कविता भस्मे मुलीस आत्महत्येला प्रवृत्त.

🔴 आदिवासी पाड्यातील ९ वीत शिकणाऱ्या कविता भस्मे मुलीस आत्महत्येला प्रवृत्त. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : 

डॉ. श्याम जाधव

इगतपुरी : धारगाव (खडाड वाडी) तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक समक्ष वैतारणा दूर क्षेत्र ( घोटी पोलीस स्टेशन) येथे फिर्यादी श्री मुकुंदा बुधा भस्मे वय३० वर्ष धंदा मजुरी आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाह करून आपले कुटुंब जबाबदारी पार पाडीत असताना नात्याने मेहुणी लागणारी आरोपी सनी बाई निवृत्ती बांगारे राहणार (वावीहर्ष ) तिचा मुलगा आरोपी किरण निवृत्ती बांगारे ह्या मुलाने इयत्ता ९ शिकत असलेली मुलगी मोटर सायकलवर बसून तिच्या घरी सोडण्याच्या बाहण्याने कविता मुकुंदा भस्मे हीस रात्री ८. ३० वाजेच्या सुमारास घरापासून दूर टेकडीवर मोटरसायकलीवर सोडून देतो असे म्हणत कविता तिच्यावर अत्याचार केला तो तिथून वावीहर्ष येथे गेला. मुलगी कविता ही घरी आली तेव्हा घाबरत, रडत झालेल्या प्रकाराबद्दल आपल्या पाल्यांना माहिती दिली. आई गंगुबाई मुकुंदा भस्मे व वडील मुकुंदा बुधा भस्मे कवितेने झालेला प्रकार कथन केला कविता हिच्यावर अत्याचार झाला असल्याचे लक्षात आले. कशीबशी रात्र तिने काढली 

▪️आरोपी सनी बाई निवृत्ती बांगर हिचा मुलगा आरोपी किरण निवृत्ती बांगर व मुलगी सविता नामदेव पारधी राणा लंगडेवाडी तालुका इगतपुरी हिने कविताचा भाऊ मुन्ना यास मोबाईल वरून जीवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्यास कविता प्रवर्त केले. 

दि. २/१/२०२५ रोजी दुपारी ३ सांगता वाजेच्या सुमारास कविता ही घरी कोणास न सांगता घरातून निघून गेली. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास काही गावातील येणाऱ्या जाणाऱ्या महिला कडून सर्व प्रकार समजला खडाडवाडी पाण्याचा कॅनल जवळ असलेल्या कारंजाच्या झाडास कविता ओढणीच्या साह्याने गळ पास घेऊन आपले जीवन यात्रा संपवली. सदर बाब लक्षात येता पोलीस पाटील यांनी घोटी पोलीस स्टेशनला कळवले. सदर मुलगी कविता हिचे प्रेत ग्रामीण रुग्णालय घोटी येथे घेऊन आले पंचनामा करून, तिचे प्रेत पोस्टमार्टम साठी जिल्हा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठविण्यात आले. प्रेत अंत्यविधीसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. संशियत आरोपी 

(१) किरण निवृत्ती बांगारे (२) सनी बाई निवृत्ती बांगारे राहणार वावी हर्ष तालुका त्र्यंबकेश्वर (३) सविता नामदेव पारधी राहणार लंगडेवाडी तालुका इगतपुरी यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आलेली आहे. कविता हीस न्याय मिळावा अशी घरच्यासह नातेवाईकांनी आशा बाळगून आहेत. 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या