6.1 C
New York
Sunday, April 26, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️बीड प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा.

♦️बीड प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा.

शिवगर्जना न्यूज, 

बिड

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपली भूमिका मांडली.

या प्रकरणाचा तपास आणि मुख्य आरोपीला २ जानेवारीपर्यंत अटक झाली नाही तर त्यांनी एक निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

सोनवणे म्हणाले, “पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी समाधानी नाही. कारण पोलीस यंत्रणा करतेय काय? कोण म्हणतंय हे प्रकरण एस.आय.टी. कडं दिलंय, मग या एस.आय.टी.चा अधिकारी कोण? हे विचारलं तर त्यांनी सांगितलं नाही. सीआयडीकडं याचा तपास दिला असंही मला पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा सीआयडीकडं ॲट्रॉसिटीची आणि खंडणीची केस दिली. या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर याचा अर्थ काय होतो? हा जो कोणी आका आहे ना, त्याचं नाव नक्कीच त्या खंडणीच्या गुन्ह्यात आहे. त्यामुळं आजची माझी एकच मागणी आहे या आकाचं नाव त्या हत्येच्या खटल्यात दाखल करा, अन्यथा माघार नाही. 

दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदारांना माझी विनंती आहे की, तुमच्या शासनाला तुम्ही याला राजीनामा द्यायला सांगा आणि याला ३०२च्या आरोपात पहिल्यांदाच गुन्हेगार करा. त्यामुळं यात राजकारण नको, पण न्याय पाहिजे. या न्यायासाठी आमची ही रस्त्यावरची प्राथमिक लढाई आहे.

पण आता येत्या २ तारखेपर्यंत जर या प्रकरणाचा तपास लागला नाही, याला अटक झाली नाही तसंच याला पकडून फासावर चढवण्याची प्रक्रिया सुरु केली नाही तर दोन तारखेनंतर दिल्ली असो महाराष्ट्र असो किंवा बीड असो मी खासदार म्हणून उपोषणाला बसणार आहे, हे मी जाहीररित्या सांगतो. संतोष आण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, एवढाच शब्द तुम्हाला देतो.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या