16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️अ.भा. मराठी साहित्य संमेलनात “शोध” या कवितेची सलग चौथ्यांदा निवड.

🔴 ९८ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात दिल्ली येथे कवी कट्ट्यासाठी कवी ॲड. उमाकांत आदमाने यांच्या “शोध” या कवितेची सलग चौथ्यांदा निवड.

🎯 दिल्लीच्या शिरपेचात मानाचा तुरा. 

शिवगर्जना न्यूज, 

पुणे : प्रतिनिधी

पुणे, तब्बल ७० वर्षानी दिल्ली मध्ये पुन्हा एकदा वाजणार मराठी भाषेचा डंका, सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिल्ली येथे होणाऱ्या कविकट्टा  काव्यमंचावर कवी, साहित्यिक, निवेदक ॲड. उमाकांत मधुकर आदमाने, यांची तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली ११०००४ येथे दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकट्टा काव्यमंचावर वारजे, पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक ॲड. उमाकांत मधुकर आदमाने यांच्या (शीर्षक : शोध) या कवितेची निवड करण्यात आली, या अगोदर कवी, साहित्यिक, निवेदक ॲड. उमाकांत मधुकर आदमाने यांनी ९५,९६ व ९७ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनात अनुक्रमे ‘सांग मी काय करू’ ‘नुसत्या तुझ्या असण्याने’ ‘मन पाखरू’ आदी विषयावर कविता सादर करून महाराष्ट्रातील सर्व कवी रसिकांना आपल्या कवितेतून मंत्रमुग्ध केले आहे, त्यामुळेच यंदाही ९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात कवी कट्ट्यासाठी कवी, साहित्यिक, निवेदक ॲड. उमाकांत मधुकर आदमाने यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आलेली आहे. दिल्ली येथील सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली ११०००४ येथे दिनांक २१,२२, व २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार असून संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्य प्रेमींना मिळणार आहे. लोक साहित्य व लोक संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक मा. डॉ. तारा भवाळकर संमेलना अध्यक्ष पदी असून स्वागताध्यक्ष मा. श्री. शरदचंद्र पवार हे आहेत, उद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत, कारण तब्बल ७० वर्षानी दिल्ली मध्ये पुन्हा एकदा वाजणार मराठी भाषेचा डंका, मराठी भाषेला मिळणार अभिजात दर्जा.

कवी ॲड. उमाकांत मधुकर आदमाने सध्या स्थायिक पुणे येथून विविध सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यिक चळवळीत सक्रीय कार्य सतत करत असतात, सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, निवेदक ॲड. उमाकांत मधुकर आदमाने यांची कविता शीर्षक ‘शोध’ तिच्या अस्तित्वाचा कवितेची कवी कट्यासाठी दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी या दरम्यान सादर करणार आहेत, कवी, साहित्यिक, निवेदक ॲड. उमाकांत मधुकर आदमाने हे सन २००९ पासून जिल्हा सत्र न्यायालय, पुणे येथे वकीली व्यवसाय करीत असून सन २०२० मध्ये त्यांची भारत सरकार नोटरी पदी निवड झालेली असून नोटरी व्यवसाय सुद्धा प्रामाणिक पणे करीत आहेत, वकिली व्यवसाया बरोबरच त्यांनी लॉकडाऊन काळात साहित्य विश्वात यशस्वी प्रवास करत या अगोदर साहित्य क्षेत्रात ९५ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, उदगीर, जि. लातूर येथे शांता शेळके कवी कट्टा वर आई या विषया वरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती, ९६ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, वर्धा येथे प्रा. देविदास सोटे कवी कट्टा वर नुसत्या तुझ्या असण्याने, आई या विषयावरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती, तसेच ९७ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, जळगाव, अमळनेर येथे कवी गणेश कुडे कवी कट्टा वर मन पाखरू…. प्रेम कविता सादर करण्याचा मला बहुमान मिळाला त्यामुळे साहित्यिक क्षेत्रात देखील आपला ठसा प्रामाणिकपणे उमटविला आहे, अनेक जिल्हास्तरीय, राजस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विविध विषयांवर पूर्ण भारत भर काव्यसंमेलनात सहभाग घेऊन त्यांनी आपल्या कविता सादर केल्या. 

त्यांचे ध्येय हेच की जनसेवा हीच राष्ट्रसेवा समजून काम करणे, हे असून शैक्षणिक व सामजिक बांधिलकी या विचारातून अनेक गरजवंत विध्यार्थांना शैक्षणीक साहित्य, गणवेश वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे, जि. लातूर चे सुपुत्र असून किल्लारी येथे झालेल्या भूंकपग्रस्त कुटुंबातील मुले आणि मुलींच्या सहभागातून त्यांना आर्थिक, सामाजिक, मग ती धान्य मागून त्यांच्यापर्यंत नेऊन देण्याचे काम त्यांनी घडवून आणलेले आहे, तसेच NSS च्या माध्यमातून गाव मौजे पुणे, अहमदनगर, सातारा, औरंगाबाद, सोलापुर, लातूर, सांगली, बीड, उस्मानाबाद, नांदेड, राजस्थान, बेंगलोर, केरळ येथे जाऊन दहा दिवसीय शिबिरात सहभाग घेऊन ‘पाणी संरक्षण’ “पाणी आडवा पाणी जिरवा” हा संदेश सर्व महाराष्ट्र भर पसरविण्याचे आतिशय मोलाचे काम केले असले तरी त्याच बरोबर वकिली व्यवसायात देखील त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मोबाईल नं. 9923072242

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या