
🔴 दत्त जयंती निमित्ताने घर अंगण बहुउद्देशीय संस्था कडून १००० लाडूचे वाटप.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
नाशिक दिनांक, १४/१२/२०२४ रोजी दत्त जयंती निमित्त घर अंगण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भाविकांना १००० लाडूंचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा आशा भोईर व सचिव अनिता पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास सह सचिव उषा सुर्यवंशी, शहराध्यक्ष अशोक बोरसे, लिगल ॲडव्हायजर श्रीकांत मोरे पाटील , खजिनदार पुनम भोईर, सदस्या वैशाली पाटील, अबोली पाटील, शिवानी पाटील, पुष्पा नवले, मार्गदर्शीका पुष्पलता ठाकूर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक देविदास निगळ, निर्माते संजय जाधव, सिने नाट्य कलावंत ओम जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
घर अंगण बहुउद्देशीय संस्था नाशिक यांचे अनेक कार्य अग्रेसर असून निशुल्क निस्वार्थ अशा एकरूप मनाने संस्थेच्या अध्यक्षा आशाताई भोईर यांची ही संकल्पना मोठी उत्सायदायी ठरते घर अंगण बहुउद्देशीय संस्थेचे एकच उद्दिष्ट आहे. जनसेवा ईश्वर सेवा होय ही संस्था गेले काही वर्षापासून सतत कार्यरत असते त्यांच्या कार्याचा उल्लेखनीय असे काम पण झालेले आहे घर अंगण बहुउद्देशीय संस्थेतर्फे अनेक महिलांना संघर्षाचा सामना करावा लागत नाही त्यांची मदत तिथे असते निस्वार्थपणे काम ईश्वर सेवा होय.
शिवगर्जना न्यूज संपादक,
श्री शहाजी वरखिंडे
मो. 9923072242















