
🔴 वर्धा येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय केसरी साठी प्रतिभा सारुकते ची निवड.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
भगूर, आज दिनांक १७/१२/२०२४ रोजी महिला महाराष्ट्र केसरी निवड करण्यात आली असून त्याची चाचणी स्वातंत्र्यवीर नरसिंग बलकवडे व्यायाम शाळा भगुर येथे घेण्यात आली आलेल्या महिला पैलवान (भरविरी) येथील प्रतिभा सारुक्ते हिचा ५० किलो वजन गटात प्रथम क्रमांक तिची निवड करण्यात आली वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी साठी तिची निवड झाल्याबद्दल तिचे खुप खुप अभिनंदन भगूर शहर व भरवीर येथील गावकऱ्यांनी मोठ्या उत्साही वातावरणात निवड करण्यात आली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भरवीर खुर्द येथे राहणारी प्रतिभा भास्कर सारुकतेस महिला महाराष्ट्र केसरी साठी निवड झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रतिभा सर्व प्रथम तुझं. खुप खुप अभिनंदन!!
परंतु आतापर्यंत कुस्ती ह्या क्षेत्रात फक्त पुरुषांनी मैदाने गाजवली, सारुक्ते परिवारातील ही एकमेव आणि पहिली महिला कुस्तीगीर म्हणून आज अभिमानाने आम्ही बऱ्याच वेळा तुझ्या नावाचा उल्लेख करतो. तुला केसरी मिळावी म्हणून आमचे सतत आशीर्वाद असतील. तुला केव्हाही अडचण भासल्यास तु कधीही निःसंकोच सांग आम्ही सतत तुझ्या मदतीसाठी तत्पर आहे. भरत खंडू सारुकते BRC मुंबई.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞9923072242















