
🔴कारेगाव फाटा येथे सोयाबीन शासकीय हमी भाव केंद्र सुरू होणार
शिवगर्जना न्यूज,
उमरी प्रतिनिधी
धर्माबाद, उमरी व नायगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची पर्वणी आहे. कारेगाव फाटा येथे दि विदर्भ को. ॲप मार्केटिंग फेडरेशन लि. नागपूर, ज्ञान सरस्वती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. मार्फत शासकीय हमी भाव योजनेद्वारे चालणाऱ्या शासकीय सोयाबीन खरेदीस सुरुवात होत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करून आपल्या शेतातील पीक शासकीय हमी भावात द्यावा. ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२४ ही आहे. सर्व शेतकरी बांधवांनी १५ डिसेंबर पर्यंत ज्ञान सरस्वती अग्रो प्रोड्युसर कंपनी लि. कारेगाव फाटा. ऑनलाइन नोंदणी करून आपले पीक हमी भावात द्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स, सन २०२४ -२०२५ ऑनलाइन पेरा नोंद असलेला सातबारा असावा. नोंदणी ठिकाण बालाजी फर्टिलायझर्स उमरी रोड, कारेगाव फाटा. गोडाऊनच्या बाजूस बळेगाव रोड कारेगाव फाटा येथे खरेदी केंद्र सुरू आहे.
अशी माहिती केंद्र संचालक जीवन परशुराम गाडीवान चोंडीकर, बाबुराव उर्फ बबलू हणमंतराव जगदंबे कारेगावकर, अनिल शिवाजीराव सुर्यवंशी वझरगेकर यांनी सर्व शेतकरी बांधवांना कळविले आहे.















