
🔴नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा सन्मान.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
हिमायतनगर- नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले आहे. यामध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या माध्यमातून बाबुराव कदम कोहळीकर यांची वर्णी लागली. नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे तब्बल ३० हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून आले. काल प्रथमच त्यांनी आमदार पदी विराजमान झाल्यानंतर हिमायतनगर शहरास भेट दिली. हिमायतनगर येथे कार्यकर्ते तथा विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये मी वडार महाराष्ट्राचा या वैचारिक संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष श्री संतोष मुद्देवाड त्यांच्या समवेत मार्गदर्शक नेतृत्व श्री साहेबराव चव्हाण, माधव गायकवाड आणि महेश गायकवाड यांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोळेकर यांचा सन्मान केला.
नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वच समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान असून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाच्या हितासाठी ते काम करतील. असे प्रतिपादन श्री संतोष मुद्देवाड यांनी आमच्या शिवगर्जना न्यूज प्रतिनिधींकडे केली आहे.
सत्कार समारंभ सोहळ्यास हिमायतनगर तालुक्यातील विविध पक्षाचे तथा संघटनांचे पदाधिकारी तथा गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.















