
♦️मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ देगलूर तालुक्यासह जिल्ह्यात कडकडीत बंद ची हाक.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी : (9923072242)
मराठा समाजाला ओ.बी.सी. मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी पासुन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणास बसलेले आहेत. परंतु शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांंना निवेदन देऊन येत्या दोन दिवसांत मागण्या मान्य करून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यास परावृत्त न केल्यास सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी नांदेड बंद ची हाक देण्यात आली.
सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, हैद्राबाद सह सातारा, बाॅम्बे गव्हर्नमेंट गैझेट लागु करावे. अंतरवाली सराटी सह संपुर्ण महाराष्ट्रातील गुन्हे सरसकट मागे घेण्यात याव्या, राज्यभरात कुणबी नोंदणी तपासणी संथ गतीने चालु आहे ती त्वरीत जलद गतीने चालु करावी, (ई.डब्लु.एस.) सह (ई.एस.बी.सी.) आणि (कुणबी) हे तिनही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत. १ जुन २००४ चा कायद्यात सुधारणा करुन मराठा व कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करावा या मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आत्ता पर्यंत पाच वेळा उपोषण केले आहे. सध्याला गरजवंत मराठा समाजासाठी सहाव्यांदा स्वतःचे रक्त जाळत…. चालू असलेल्या उपोषणास बसले आहेत. सरकारने येत्या दोन दिवसांत मागण्या मान्य करून जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यास परावृत्त करावे अन्यथा सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी देगलूर तालुका कडकडीत बंद करण्यात येईल असे निवेदन मा. उपजिल्हाधिकारी देगलूर, तहसील कार्यालय देगलूर, पोलिस स्टेशन देगलूर या कार्यालयास अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.















