16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नवीन मतदारांचे नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट करा- भाजपा शहराध्यक्ष गजानन पाटील.

🔴 नवीन मतदारांचे नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट करा — भाजपा शहराध्यक्ष गजानन पाटील.

शिवगर्जना न्यूज, 

उमरी प्रतिनिधी 

उमरी शहरातील अनेक बुथ वार्डा मध्ये नवीन मतदारांची नावे समाविष्ट करावयाचे आहेत परंतु त्यांना त्याचे ज्ञान अपुरे असल्या अभावी त्यांनी बी.ल.ओ. कडे किंवा इतर ठिकाणी जाऊन आपले नाव हे मतदार यादी मध्ये समाविष्ट करून घेतली नाही त्यामुळे त्यांचे नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही.

शहरातील प्रत्येक BLO यांना कळवून त्यांच्या भागातील नवीन मतदार धारकांचे नाव मतदार यादी मध्ये समावीष्ट बंधन घालावे या बाबत उमरी भाजपा शहराध्यक्ष गजानन पाटील यांनी तहसीलदार प्रशांत थोरात साहेब यांना निवेदन दिले. यावेळी उपस्थित गजानन पाटील भाजपा शहराध्यक्ष, रईस पठाण जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक, महेश पडोळे राष्ट्रवादी शहराध्यक्ष, अतुल पाटील आचकुलवार उमरी, अतुल जाधव उमरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या