16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नायगाव तालुक्यात मराठा आरक्षणासाठी… आणखीन एका तरुणाची आत्महत्या.

⚫ नायगाव तालुक्यात मराठा आरक्षणासाठी अजून एक आत्महत्या. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण अंकुश बाबुराव ढगे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे निराशेतून शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आपली आत्महत्या केली आहे. 

सुशिक्षित बेरोजगार असून कमालीची शिक्षणाची गोडी असलेला तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना… परंतु सरकारच्या मराठा समाजा संदर्भातील उदासीन धोरणामुळे मराठा समाजाला आरक्षणा पासून वंचित ठेवल्यामुळे तो नेहमी तणावात राहत होता. दिनांक १८/०९/ २०२४ रोजी सायंकाळी ठीक ९.०० च्या दरम्यान शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

आत्महत्या करण्यापूर्वी आपली परिस्थिती खुप हलाखीची असून, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नौकरी लागत नाही त्यामुळे “मी स्वतः समाजाला आरक्षण मिळावे” म्हणून आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी लिहून सदरील तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली आहे. आजपर्यंत मराठा आरक्षण मिळावे म्हणून नायगाव तालुक्यातील नऊ (०९) तरुणांने आपली जीवनयात्रा संपविली आहे.

दैनंदिन अशा घटना घडत असतांना सुध्दा या निर्दयी शासनाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळ मिळत नाही. आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे मदत ताबडतोब मिळावी. तसेच तात्काळ मराठा समाजाला ओ.बी.सी. मध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्याकडे केली मागणी. 

सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अजून किती युवकांचे बळी घेणार आहे हे सरकार असे शिवराज पाटील होटाळकर म्हणाले. तसेच समाज देखील सवाल करत मराठा समाजातील तरुण या सरकारला विचारत आहेत.

यावेळी नायगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते चंद्रकांत पाटील पवार, रावसाहेब पाटील शिंदे, साई पाटील मोरे, शेषेराव पाटील बेलकर व यासह असंख्य समाज बांधव शासनाचा निषेध करण्यासाठी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या