16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मा. दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान.

🔴 मा. दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान. 

शिवगर्जना न्यूज, 

प्रतिनिधी 

जगदीप वनशिव 

पुणे- येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या तर्फे या वर्षीचा मानाचा पुरस्कार मा. दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव चव्हाण उपाध्यक्ष सुनिल राव रासने उत्सव प्रमुख अक्षय प्रतापराव गोडसे कोषाध्यक्ष महेशभाऊ सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ चांदीची ट्रॉफी यावेळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

सामाजीक बांधिलकी वैचारिक मंथन करत मार्मिक भाष्य करत असणारे निसर्ग प्रेमी दत्तात्रय निकाळजे उर्फ आबासाहेब हे “झाडे लावा, जीव वाचवा” नेहमी संदेश देत असतात. झाडांमुळे आरोग्य संपदा जपली जाते असे ते नेहमीच सांगतात. झाडांची नाती जपली तरच माणुसकी जपता येते आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे आजचा मिळालेला पुरस्कार आहे असे ते पुरस्कार स्वीकारताना म्हणाले त्यांच्या सोबत आई वडील बापू साहेब निकाळजे धाकटे बंधू मंगेश निकाळजे मित्र परिवार हजर होता. निवेदक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव अनेक क्षेत्रातील मान्यवर हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सभामंडपात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या