
🔴 दिव्यांग बांधवांनी आंदोलन सुरूवात करताच कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी नांदेड यांनी शिष्ट मंडळा सोबत चर्चा करून संबंधीत दि.१३ सप्टे. २०२४ रोजी सुनावनीचे लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन स्थगित.
♦️आंदोलनासाठी दिव्यांगानी सहभाग घेऊ नये असे आव्हान चंपतराव डाकोरे पा.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी : चंपतराव डाकोरे पा.
नांदेड दिव्यांग, वृध्द निराधार बांधवांना शासनाने अनेक योजना जाहीर करुन ते फक्त कागदावरच राहात असल्यामुळे दिव्यांगाना हक्क मिळावा म्हणून शासनाने दिव्यांग कायदा २०१६ चा कायदा करून त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अनेक प्रश्नांसाठी अनेक आंदोलने करुन कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे होत नसल्यामुळे दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग, वृध्द, निराधार बांधवांना हक्क द्या देता येत नसेल तर आमची अव्हेलना होऊ नये जंगली जनावरा प्रमाणे जगने अशक्य असल्यामुळे, द्ररीद्री जीवनातून मुक्तता करण्यात यावी म्हणून दि.१० सप्टेंबर २०२४ पासुन ऑफिस वेळेत दररोज अनेक प्रकारचे बेमुदत धरने आंदोलनास सुरूवात करताच मा.कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी साहेबांनी शिष्ट मंडळा सोबत चर्चा करून तातडीने संबधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत सुनावणी घेऊन न्याय देण्याचे लेखी आदेश दिल्यामुळे काही दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले. सुनावनी नंतर दिव्यांगास न्याय हक्क नाही दिल्यास पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येईल या आंदोलनात बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड, संभाजी ब्रिगेड दिव्यांग, जिल्हा नांदेड यांनी जाहीर पाठिंबा व आंदोलनात सहभागी होते. सोशल मिडिया प्रेमी संपादक साहेब/पत्रकारांनी दिन दुबळ्यांना न्याय मिळावा म्हणुन कुंभकर्ण जागे करण्यासाठी प्रसिध्दी दिल्यामुळे आम्हा दिन दुबळ्यांना न्याय मिळत आहे.
जिल्ह्यातील दिव्यांगानी, पदाधिकारी धरणे आंदोलनात संघर्षात शेकडो, दिव्यांगानी आपली संघटित शक्ती पहिल्याच दिवशी उपस्थित राहुन आपल्या हक्कासाठी सहभागी झाले होते.
दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव पा. डाकोरे, बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे, संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पाटील गुबरे सुगावकर, संभाजी पाटील आलेगावकर, चांदराव चव्हाण, मानसिंग वडजे, मिलिंद चिगोटे, चादु गोरटकर, आळे, शिवपुजे, ऊत्तम चिगोटे, चांदु गवाले,माधव येल्दे, गणपती वडजे, इत्यादी शेकडो दिव्यांग ऊपस्थित होते.















