🔴 नाद मोबाईल चा 🔴
शिवगर्जना न्यूज,
संगीता रामटेके पाटील गडचिरोली ✍️
मोबाईल नाद नाही बरा
गमावून टाकतो स्मरण शक्तीला
प्राणा हून प्रिय आहे मोबाईल
कारणीभूत आहे अर्धे पागल होण्याला..?
नको नको रे मोबाईल
मोबाईलचा खेळ नाही बरा
मेंदू , मस्तक सुन्न करते
नजर होईल कमजोर जरा
सारखा सारखा मोबाईल
हातात असते दिवस रात्र
एक उघडले की दुसरे
सतत चालूच असते सत्र
अभ्यास गेला, होमवर्क गेला
पपजी गेम, खेळात रमला
मित्रा संगे चॅटिंग करून तू
पहिल्या सत्रात नापास झाला
इस्टाग्राम, व्हॉट्सप, एफ.बी वर
राहून राहून बिघडत आहे
शैक्षणिक प्रगतीत मागे राहून
आई बाबांचे दिवाळे काढीत आहे
भाऊ बहिण, आई वडील
जवळ राहून मुके बहिरे
ना संवाद, ना हास्य कसले
मोबाईल मध्ये लक्ष सारे
रक्ताचे नाते दुरावत गेले
आपुलकीचे नाते नाही
इतका पराक्रम केला हो
एका मोबाईल ने काही
मोबाईल वरील मित्र सारे
वाटतात रे तुला जवळचे
रक्ताचे नाते झाले नकोसे
वाईट वाटते आज त्याचे.