
🔴 भरवीर खुर्द ७८ भारतीय स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.
शिवगर्जना न्यूज,
इगतपुरी प्रतिनिधी : भास्कर सारुकते
इगतपुरी भरवीर खुर्द आज दिनांक १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा गावातील पोलीस पाटील व बाल भैरव फाउंडेशन च्या मार्गदर्शना खाली शाळेतील गोर गरीब विद्यार्थी यांना चेक स्वरूपात देणगी देण्यात आली आदिवासी नारी मुक्ताई ताई सारुकते यांनी शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप करण्यात आले. श्री मुरलीधर बांडे हे सतत कुठल्याही गावातील कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य करतात शाळेतील मुलांना बिस्किटे पाकीट चॉकलेट सोन पापडी ई. खाऊ वाटप करून सहकार्य लाभले सागर बाळू बांडे आदिवासी योद्धा सतत शाळेसाठी भेटवस्तू देऊन आपले सहकार्य करतात यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला. गावातील माजी सरपंच श्री रामभाऊ सारुकते उपस्थित होते. भरवीर खुर्द जिल्हा परिषद विद्यार्थी, रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेले रोहित हिरामण टोचे यांचा पण सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वालझाडे मॅडम व मुक्ता ताई सारुकते यांचा सन्मान करण्यात आला तसेच गावातील सर्व ग्रामपंचायत सभासद व गावकरी मोठ्या संख्येने हजर होते. तसेच गावातील ग्रामस्थानिक शिवाजी काजळे, भाऊसाहेब सोनवणे, भास्कर दादा सारुकते, लक्ष्मण शिंदे, समाधान डावरे, शांताराम सारुकते, विकास कोकणे, संपत टोचे, शंकर पुंडे शिवसेना (उ.बा.ठा.) अध्यक्ष सुरज कोकणे, सोमनाथ टोचे तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक वृंदावन श्री खैरनार, श्री महाजन, श्री क्षीरसागर व श्री टोचे शिक्षक वृंद सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक भारतीय स्वतंत्र दिनानिमित्ताने ध्वजावंदनास सलामी (मानवंदना) देण्यासाठी एकत्रित येऊन आपल्या गावातील शान शोभा वाढवली.















