8.3 C
New York
Monday, April 27, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ लाडकी बहीण योजनेत कार्यकर्त्यांनी महिलांना सहकार्य करावे— ना. आदिती तटकरे

🔴 लाडकी बहीण योजनेत कार्यकर्त्यांनी महिलांना सहकार्य करावे— ना. आदिती तटकरे. 

 शिवगर्जना न्यूज, 

नांदेड जि. प्रतिनिधी : निळकंठ जाधव

लाडकी बहीण योजना महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाची असून ही योजना अमलांत आणून राज्य सरकारने महिला सक्षमी करणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे व या योजनेचा लाभ महिलांना मिळून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महिलांना सहकार्य करावे असे आव्हान राजाच्या महिला व बाल विकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी हदगाव येथे महिला संवाद मेळावा या कार्यक्रमात केले 

रा. काँ. पक्षाचे हदगाव तालुका अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच अमोल पा. कदम रुईकर यांनी हदगाव येथे शिव पार्वती मंगल कार्यालय महिला संवाद मेळाव्या चे आयोजन केले होते. कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पा. प्रमुख पाहुणे म्हणून रा.काँ. युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे होते. नांदेड शहर जिल्हाध्यक्ष जीवन पा. घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, दिलीपराव धर्माधिकारी, विश्वंभर पवार, शहर अध्यक्ष नांदेड फिरोज भाई पटेल शहर कार्याध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष सौ. पूजा पा. व्यवहारे, सौ. सुनंदा जोगदंड, युती जिल्हाध्यक्ष, ज्योती सोनटक्के रा.यु. प्रदेश सरचिटणीस कन्हैया कदम, अतुल हिंगमिरे व सर्व सेलचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाचे संयोजक आयोजक अमोल पाटील कदम रुईकर यांनी केले. 

प्रस्ताविकात लाडकी बहिण योजने मध्ये चार चाकी वहान अट शिथिल करावी, हदगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत महिलांना के.वाय.सी. करण्यासाठी उपाय योजना कराव्यात त्यामुळे महिलांना हा त्रास होणार नाही. बचत गटांना हदगाव ठिकाणी महिला भवन स्थापन करावे. महिलांच्या वतीने कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमोल कदम यांनी केले. 

यावेळी नामदार आदिती तटकरे हदगाव येथे कार्यक्रमास आयोजित केल्याबद्दल अमोल कदम यांचे कौतुकाने रा.काँ. पार्टी चा आमदार, खासदार, जि.प.सदस्य नसतांना देखील केवळ पक्ष बांधणीसाठी व महिला करिता चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले असे मनोगून गात, सर्वसामान्य कुटुंबातील पदाधिकरण न्याय देण्यासाठी पक्ष कार्यकर्त्या सोबत ठाम पणे राहील असे सांगण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी सुरज चव्हाण होते. कार्यक्रमाच्या आयोजना मूळे अमोल कदम यांना अभिनंदन करून पुढील काळात पक्ष श्रेष्ठी आपल्या पाठीशी भक्कम पणे उभे राहील असे त्यांनी या ठिकाणी संबोधित केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत सुगावे पा. अध्यक्षीय समारोपात आयोजक अमोल कदम यांनी साधे एक पत्र देऊन कार्यक्रमाची मागणी केली. तालुका पातळीवर कार्यकर्त्याची पक्षाने दखल घेऊन नामदार तटकरे त्यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम दिला त्यामुळे निश्चितच पक्ष श्रेष्ठी आभार मानतो यामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बळ मिळेल व पक्षा मध्ये उत्साह निर्माण झाला असून आगामी काळात पक्षाची घोडदौड जोमाने चालत ठेवून पक्ष वाढवून असे अध्यक्ष समोर सांगण्यात आले. 

यावेळी सूत्र संचालन गजानन जाधव वाटेगावकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिमायतनगर ता. अध्यक्ष अभिषेक लुटे, तालुका संघटक दीपक कदम, विष्णू कदम, नारायण कदम, सतीश कदम, रोहन कदम, अमोल कदम, कपिल कदम, देविदास दुकानदार, गजानन कदम यांनी सहकार्य केले या कार्यक्रमास महिला भगिनी युती कार्यकर्ते पदाधिकारी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या