
🔴 जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा.
शिवगर्जना न्यूज,
इगतपुरी तालुका प्रतिनिधी : भास्कर सारुकते
इगतपुरी. भरविर दिनांक ०९/०८/२०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा भरवीर खुर्द तालुका इगतपुरी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा. जि.प.प्रा. शाळेत भरवीर खुर्द जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आपल्या गावातील आदिवासी संघटनेचे श्री सागर भाऊ बांडे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन, चाॅकलेट, खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी गावातील पोलीस पा. श्री रमेश टोचे, माजी सरपंच श्री रामभाऊ सारुकते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान डावखरे, सी.एम.ए. माजी अध्यक्ष श्री शिवाजी काळे, श्री लक्ष्मण शिंदे, श्री भाऊसाहेब सोनवणे, श्री देवदास शिंदे, श्री संजय शिंदे, एस एम सी अध्यक्ष श्री डावखरे. तसेच पालक, बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्याचे चे गीतांचे सादरीकरण केले. आदिवासी दिनाचे महत्त्व आपल्याला भाषणातून चांगल्या प्रकारे व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका वालझाडे केले.
यावेळी लगड, शिक्षक, शिक्षिका सर,आंबेकर सर, खैरनार मॅडम, क्षीरसागर मॅडम व फणसे मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित गावकरी मंडळी मुरलीधर मांडे हे या कार्यक्रमास उपस्थित होते. महिला आदिवासी विद्यार्थिनी व विद्यार्थी आजू बाजूच्या गावातील आदिवासी मुलांनी व पालकांनी त्याचा आनंद घेतला. यावेळी नृत्यातून समस्त गावकरी व विद्यार्थी विद्यार्थिनी जागतिक आदिवासी दिना निमित्ताने रंगीत तालिमाचा आयोजित करण्यात आले. विद्यार्थिनीच्या गायनातून व शब्द रचनेतून त्यांचा आनंद व्यक्त केले.















