9.8 C
New York
Sunday, May 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️आजाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या कडून उपनगर पोलीस ठाणे जाहीर निवेदन.

🔴 आजाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्याकडून उपनगर पोलीस ठाणे जाहीर निवेदन. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : श्याम जाधव

नाशिक : उपनगर आज दिनांक ५/८/२०२४ ऑगस्ट रोजी आजा समाज पार्टी महिला मोर्चा, महिला अध्यक्ष नेहा ताई शिंदे यांच्या अध्यक्ष आदेशानुसार उप नगर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित महिला मोर्चाच्या महिला संगीता निकम, महाराष्ट्र संघटक माधुरी आहेरे, नाशिक शहर अध्यक्षा मनीषा पवार, नाशिक जिल्हा संघटक उपाध्यक्ष पल्लवी पगारे, नाशिक जिल्हा संघटक सुनिता पवार, नाशिक शहर अध्यक्षा जया पवार कार्यकर्त्यांनी ह्या वेळेस उपस्थित होते. आजाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने निवेदन देऊन माननीय पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून याप्रसंगी महिला पोलीस उपस्थित होत्या. 

अनेक समाजा मध्ये भितीदायक वातावरण तयार झाले असून, महिला सुरक्षित असावे या करीता महिला समितीच्या वतीने नाशिक उप नगर पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन अशा काही घटना घडलेल्या असून त्या होता कामा नये अशी खबरदारीचे उपायोजना करावे असे निवेदनात म्हटले आहे. मागील काही काळात अशा काही घटना घडलेल्या असून, २८/६/२०२४ रोजी लातूर कस्तुरबा वस्तीगृहातील सायली गायकवाड यांचा मृत्यू ६/७/२०२४ रोजी अक्षदा म्हात्रे बेलापूर नवी मुंबई शिळफाटा येथे गणेश घळ मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने महिले सोबत बलात्कार करून महिलेला मारून मृतदेह जंगलात फेकला. 

२७/०७/२०२४ रोजी उरण येथे राहणाऱ्या २२ वर्षीय जयश्री शिंदे हिचे अतिशय विकृतपणे शरीराचे अवयव कापून हत्या केली. 

०१/०८/२०२४ रोजी मुंबई शिवडा येथे पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर तीस वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला. महाराष्ट्रातील वर्ष भरात एका नंतर एक अशी अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. म्हणून प्रत्यक्षात निषेध नोंदवण्यासाठी माणसाला लाज वाटणारी अशी माणुसकीला काळिमा फासणारी एका नंतर एक घडलेले गुन्हे हे दर्शविते की, दिवसें दिवस विकृती वाढत चाललेले आहे. यावर वेळीच आळा घालावे असे नागरीकांच्या माध्यमातून बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या