०१ सप्टेंबर २०२३ :– मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापन दिन देगलुर मधे संभाजी ब्रिगेड द्वारा मित्र परिवारा सह उत्साहात साजरा झाला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, युगपुरुष आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी १९९० मध्ये स्थापन केलेल्या मराठा सेवा संघाचे आज मोठ्या वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे.
गेल्या ३२ वर्षांमध्ये मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सह ३३ कक्षाच्या माध्यमातुन बहुजन समाजाला उच्च स्तरावर नेले. समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी महाराष्ट्रा सह इतर राज्य, देश, विदेश स्तरावर सर्व समाज, अठरा पगड जाती च्या कल्याणासाठी प्रयत्न केले आहेत. सामाजिक ,राजकीय ,धार्मिक , आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात समाज जागृतीचे कार्य होत आहे . मोठ्या संख्येने असलेला समूह एकतर एकत्र येत नाही आणि आला तर तो टिकून राहत नाही पण मराठा सेवा संघाने ही परंपरा मोडीत काढुन गेल्या ३२ वर्षापासून खंबीरपने, ऐकोप्याने, प्रगतिशील पणे अविरत कार्य केले आहे व आज ही संपूर्ण मानव जातीला योग्य जीवन जगण्याचा मार्ग दाखवत आहे.
याची जाणीव सर्व बहुजनां पर्यन्त पोहचावी यासाठी ३३ वा वर्धापन दिवस श्रीराम पतसंस्था देगलुर येथे माँ जिजाऊ यांचे पुजन करून डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गायन करून अभिवादनाने झाली व वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक जेजेराव पाटील शिंदे करड्खेडवाडीकर यांनी केले अनुमोदन बालाजी जाधव . उपस्थित पदाधिकारी नामदेव पाटील थडके, नारायण वड्जे उण्द्रीकर, सुभाष हिंगोले , अंकुश जाधव रणजित भाऊ हिंगोले मनोगत व्यक्त करून सर्वानी एकत्र येऊन अंधश्रद्ध, कर्मकांड नष्ट करून उन्नत बहुजन समाज कसा घडवायचा या वर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मार्गदर्शन संभाजी ब्रिगेड, विभागीय अध्यक्ष संकेत पाटील सोमुरकर यांनी केले . सुत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन बालाजी पाटील कुशावाडीकर यांनी केले. मेडिया चे शहाजी वरखिंडे यांनी मेडिया कव्हरेज घेतला.यावेळी कपिल पाटील तडकेले पांडू पाटील सकरगेकर ,आनंदजी कोसंबे , अमोल मेह्त्रे, अक्षय आवळे, बंडू जाधव , मन्मथ घुलेकर , सुमित वाघमारे, सुनील कांबळे, शहाजी पाटील सह मोठय़ा प्रमाणात, शिव, शाहु, फुले, आंबेडकर प्रेमी उपस्थित होते .