देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर सचिव पदाचा राजीनामा देऊन असंख्य कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत संपर्क प्रमुख मा. आनंदराव जाधव नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या हस्ते ईतर कार्यकर्ते देगलूर येथिल गोविंद माधव मंगल कार्यालयात जाहीर प्रवेश केला. पक्षात होणा-या एकाधरशाहीला कंटाळून आज असंख्य कार्यकर्ते समवेत धनाजी जोशी यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी संपर्क प्रमुख मा. आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख मा. उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख मा. आनंदराव बोंडारकर युवा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आकाश रेड्डी याताळकर, देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख घाळप्पा अंबेसंगे, शहरप्रमुख व्यंकट पुरमवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
आजच्या प्रवेशानंतर धनाजी जोशी यांच्याशी संपर्क केला असता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात होणारी घुसमट एकाधिकारशाही पैशाच्या जोरावर चालणारं राजकारण रोज होणारा कार्यकर्ताचा होणारा खच्चीकरण.
निष्ठावंतांना डावलून इतरांना पदावर बसवितात. अनेकदा वरिष्ठांना तक्रार करून सुद्धा कोणी दखल घेत नसुन पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची किमंत नसुन चापलुसी करणार्यांची कदर केली जाते. असे धनाजी जोशी यांनी सांगितले व सामाजिक कार्य असताना जवळ पास जनतेच्या हितासाठी अन्याविरूध्द आवाज उठविण्यासाठी जवळपास 500 निवेदन प्रशासनाला दिले. लोकांच्या हितासाठी बसस्थानकामध्ये पोलीस चौकी उभारण्यासाठी प्रयत्न करून प्रशासनाला पोलिस चौकी साठी भाग पाडलं, विशाल नगर येथील लोकांना होणार्या त्रासासाठी निवेदन देऊन मुरुम टाकण्यासंदर्भात भाग पाडले जनतेच्या हितासाठी अन्याविरूध्द आवाज उठविण्यासाठी रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची किमंत न ठेवता स्वार्थासाठी पद देऊन आम्हास अन्यायाचा मार बसल्यामुळे स्वाभिमानाने आज असंख्य कार्यकर्ते समवेत वरिष्ठांवर विश्वास ठेवून धनाजी मनोहरराव जोशी यांनी प्रवेश केल्याचे सांगितले.