
♦️नऊ ऑगस्ट २०२४ क्रांती दिनी दिव्यांग वृध्द निराधार आपल्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे यल्गार मोर्चा सहभाग नोंदवावा– चंपतराव डाकोरे पाटील.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड जिल्हा प्रतिनिधी, : चंपतराव पा. डाकोरे
देशाला स्वतंत्र मिळून ७६ वर्ष पूर्ण झाले तरी दिव्यांग वृध्द, निराधाराना न्याय हक्क मिळत नसल्यामुळे दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र व बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड यांच्या संयुक्त पणे दिव्यांग, वृध्द निराधार बांधवाचा दि.९ ऑगस्ट 2024 क्रांती दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे तिव्र एल्गार मोर्च्याने दिव्यांग, वृध्द निराधारानी सहभागी व्हावे असे अव्हाहन चंपतराव डाकोरे, राहुल साळवे यांनी केले.
शासनाच्या विविध कल्याण कारी योजनेसाठी अनेक वेळा दिव्यांगासाठी कायदे करून तेच कायदे करणारे लोकप्रतिनिधी दिव्यांगाना हक्कापासून वंचित ठेवतात. ज्या दिव्यांगाना चालता येत नाही, बोलता येत नाही, जगात काय चालले ते दिसत नाही, ऐकू येत नाही आणि आपले दु:ख सांगण्यासाठी बोलता येत नाही. अशा दिव्यांगासाठी केलेला कायदा शासन, प्रशासन त्यांची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे त्यांची अंमल बजावणी व्हावी म्हणून दिव्यांग संघटनांनी अनेक वेळा, निवेदन, धरणे आंदोलन उपोषण मोर्चे निवेदन, दिल्यानंतर नांदेड मा. जि. अधिकारी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील, व संबंधित अधिकारी यांची सहा वेळा बैठका झाल्या. संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही कराण्यात येईल असे आदेशात करुन दोन वर्षांत दिव्यांगाचे प्रश्न सोडवणुक झाली नाही.
महाराष्ट्राच्या शेजारच्या आंध्रा प्रदेश मध्ये दिव्यांगाना दरमहा सहा हजार मिळते तर महाराष्ट्रात का मिळत नाही, दिव्यांग, वृध्द निराधाराना, शेतमजुरी करणाऱ्यांना शासकीय सवलतीसाठी उत्पन्नाची अट असते तर लोक प्रतिनिधीना अटी का नसतात. अशा अनेक प्रश्नांसाठी दिव्यांग, वृध्द निराधारानी या आंदोलनात सहभागी व्हावे.















