16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️शिक्षक संघटनेच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा — रविंद्र वसंतराव चव्हाण.

🔴 शिक्षक संघटनेच्या अनुदानीत कर्मचाऱ्यांना प्रचलित वाढीव टप्पा देण्यात यावा या आंदोलनास जाहीर पाठिंबा —प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण.

शिवगर्जना न्यूज, 

 प्रतिनिधी : दिपक गजभारे 

महाराष्ट्रातील अनेक शिक्षक अनेक दिवसांपासून प्रचलित वाढीव टप्पा मिळण्यासाठी आंदोलन करीत आहेत बरेच कर्मचारी २० टक्के ३० टक्के अनुदानावर अहो रात्र पणे ज्ञान दानाचे कार्य करत आहे तरी हे सरकार त्यांचा वाढीव टप्पा मंजूर करत नसल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षक समन्वय संघ नांदेड यांच्या तर्फे अंशतः अनुदानीत कर्मचाऱ्यांना प्रचलित धोरणा नुसार वाढीव अनुदान टप्पा वितरित करण्यात यावा या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनास खासदार वसंतराव बळवंतराव पा.चव्हाण यांचे प्रतिनिधी व एक संस्था चालक म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी या आंदोलनात भर पावसात सहभाग घेतला आणि शिक्षकांच्या प्रत्येक लढ्यात सोबत राहीन असा शब्द ही दिला. 

या आंदोलनात मा.प्रा. जांभरूणकर, मा.प्रा.गोविंदराव मेथे व सर्व अंशतः अनुदानित शिक्षक मंडळी आंदोलनास बसलेली सर्व शिक्षक मंडळी ची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या