
🔴 आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था नांदेड, महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी वितरण सोहळा दि.२८ जुलै २०२४ पांगरी विष्णुपुरी जवळ नांदेड पारायण संकल्प पूर्ती सोहळा वर्ष ७ वे.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : चंपतराव डाकोरे
♦️आपल्या तालुक्यातील जे नवीन व जुने साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत त्यांना खालील प्रमाणे सूचना द्याव्यात.
१) ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नाही त्यांनाच ज्ञानेश्वरी पारायण प्रत देण्यात येईल.
२) पारायण करावयाचे यावर्षीचे जे वेळापत्रक आहे त्यानुसार पारायण करण्या बाबत कळवावे.
३) ९ सप्टेंबर २०२४ रोजी मामा मंगल कार्यालय मारतळा येथे सांगता समारंभासाठी यावे लागेल असे साधकांना कळवावे.
४) यावर्षीचे साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत कारण आपला “ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या तेवढे साधक” (९०३३ ओव्या) हा संकल्प यावर्षी पूर्ण होत आहे. याबाबत यापूर्वी पारायणात बसलेल्या व नव्याने बसलेल्या सर्व साधकांना कळवावे.
५) ज्या नवीन साधकांना यावर्षी पारायण करण्यास बसावयाचे आहे त्यांची नावे दिनांक २५ जुलै २०२४ पर्यंतच पाठवावीत. यानंतर आलेले नावे स्विकारली जाणार नाहीत याबाबत स्पष्टपणे तालुका स्तरावर सर्व पदाधिकारी मंडळींनी साधकांना कळवावे. २५ सप्टेंबर नंतर आलेली नावे स्विकारली जाणार नाहीत. कारण ऐन वेळी आलेल्या नावामुळे ज्ञानेश्वरी प्रती गोरखपुर वरून मागवणे परत साधकांना पारायण आरंभ करण्यापूर्वी घरापर्यंत पोहोचवणे हे अतिशय कठीण होते.
६) जे नवीन साधक आहेत त्यांना पारायण करण्यासाठी लागणारे ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन जाण्यासाठी सर्व तालुक्यातील निवडक मंडळींनी दिनांक:-२८जुलै २०२४ रोजी पांगरी येथे सकाळी १० ते २ या वेळेमध्ये येऊन ग्रंथ घेऊन जावेत व ५ ऑगस्ट पूर्वी जे आपल्याकडून साधक जोडले गेलेले आहेत त्यांना त्यांच्या घरपोच ग्रंथ नेऊन द्यावा ही जबाबदारी सर्वस्वी तालुका स्तरावर काम करणाऱ्या पदाधिकारी मंडळींची असेल.
७) आपल्या गावातील, आपल्या संपर्कातील आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील किंवा जिल्ह्या बाहेरील जे काही साधक आपल्या परिचयातून यापूर्वी पारायण करण्यास बसलेले आहेत अशा सर्व साधकांना या वर्षीचा संकल्पपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे याबाबत कळवावे व या वर्षीचे पारायण वेळा पत्रक त्यांच्या पर्यंत सोशल मीडिया च्य माध्यमातून पोहोचवावे व त्यांना यावर्षी पारायण करण्यास बसण्यास आग्रह करावा. यापूर्वी ज्यांनी पारायण केलेले आहे त्यांना अतिशय अडचणीच्या कामामुळे पारायण करण्यास बसणे शक्य होत नसल्यास त्यांना त्यांच्या नावावर त्यांच्या परिवारातील कोणत्याही स्त्री, पुरुष, बालक यापैकी कोणा एकास पारायण करण्यास बसवा असे, आग्रहपूर्वक कळवावे व त्यांना सांगतेच्या दिवशी आवर्जून उपस्थित रहावे याबाबत विनंती करावी.🙏🏾🚩
आपला संत चरणरज
ह.भ.प. राम महाराज पांगरेकर
संस्थापक – अध्यक्ष
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था.















