*देगलूर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने “होऊ द्या चर्चा” पंधरवाडा मोहीम”*
देगलूर:
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री बबनराव थोरात यांच्या व जिल्हा प्रमुख मा.श्री प्रमोद खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली *दि.०२ ऑक्टोबर पासून ते १२ ऑक्टोबर* दरम्यान *होऊ द्या चर्चा* हा भाजपच्या बोलघेवड्या पोकळ, फसव्या घोषणेचा भांडाफोड चर्चा जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून यांचा शुभारंभ देगलूर तालुक्यातील लोणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीफळ फोडून व तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे यांच्या मूळगावी खूतमापूर येथे शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालूकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खूतमापूरकर शिवसेना उपतालुकाप्रमुख पुरुषोत्तम अन्सापुरे, उपतालुकाप्रमुख तथा लोणी चे उपसरपंच मानाजी पाटील लोणे, वक्ता निलेश टकले पाटील, चोपडे, शिवसेना शाखा प्रमुख नारायण शिंदे आदीसह शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.















