21.6 C
New York
Sunday, May 10, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावे

♦️शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ व शेतकऱ्यांना कुठल्याही खरेदी केंद्रावर काटा करण्याची मुभा द्यावी. 

 ◼️बालाजी बच्चेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. 

शिवगर्जना न्यूज,

 नांदेड प्रतिनिधी : निळकंठ पाटील

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन विक्रीला मुदतवाढ देण्यात यावी व ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची आँनलाईन नोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्याचे सोयाबीन ज्या काट्यावर गर्दी नाही अशा ठिकाणी तातडीने मोज माप करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सोयाबीन खरेदी केंद्रास वारंवार मुदतवाढ दिली आहे परंतु शेतकरी यांच्याकडील सोयाबीन अद्याप शिल्लक आहे. अनेक सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी व रांगा लागल्या आहेत. त्याचप्रमाणे शासनाने दिलेली मुदतवाढ हि ३१ जानेवारी रोजी संपत आहे. मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन खरेदी केंद्रास आणखीन मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील अनेक सोयाबीन खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी व शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काटा करण्यासाठी तीन चार दिवस लागत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन गर्दी व रांगा नाहीत अशा खरेदी केंद्रावर घेण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. तसेच विदर्भ आग्रो एजनसीचे ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन ची शंभर टक्के खरेदी होणार नाही तोपर्यंत शासनाने सोयाबीन खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या