
🔴 देगलूर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष पदी मंगल पांडे.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर : प्रतिनिधींनी
देगलूर : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सर्वपक्षीय शिवप्रेमी कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी (ता.२२) रोजी होऊन यंदाच्या उत्सव समितीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी देगाव माजी सरपंच मंगल विनायकराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
२०२५ शिवजयंती उत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांसह कृषी विषयक कार्यक्रमही आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन केले जाणार आहे. समितीच्या इतर कार्यकारणीत उपाध्यक्षपदी जेजेराव प शिंदे, सचिव पदी राजू पा. मलकापूरकर, कार्याध्यक्षपदी कैलास येसगे, डॉ. सुनील जाधव, स्वागताध्यक्ष पदी बाबू पा. सुगावकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणीत कोषाध्यक्षपदी भाजप शहराध्यक्ष प्रशांत दासरवार, संघटक म्हणून जयपाल कांबळे, शेख अस्लम सहसचिव म्हणून सदाशिव शिंदे, रमेश पा. वनाळीकर, राजू देशमुख, सुलता कुरेशी, गजानन शिंदे, बालाजी पा. थडके, रुपेश पाटील, पांडुरंग पा. थडके, जयदीप वरखिंडे, संदीप शिंदे आदींची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी वेळी सत्कार करण्यात आला.
नूतन गठित समितीच्या वतीने शिव जयंती निमित्त यंदा पहिल्यांदाच कृषि विषयक कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदश करण्यात येणार आहे.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी नारायणराव वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















