
🔴 राधिका फाउंडेशन च्या अंबड शाखेचे उद्घाटन आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ थाटामाटात संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉक्टर शाम जाधव
नाशिक दि. १८जानेवारी २०२५ रोजी राधिका फाउंडेशन अंबड शाखेचे उद्घाटन आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ प्रमुख अतिथी आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर चेतना सेवक या होत्या तर कार्यक्रमाच्या आयोजक सौ गायत्री लचके या होत्या. प्रमुख पाहुण्यांत श्री सुनील पवार -वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस स्टेशनश्री. विश्वास लचके – नाशिक लोकशाही न्यूज संचालक सौ. भाग्यश्री ताई ढोमसे, -माजी नगरसेविका सौ. नंदिनी कहांडळ – मातोश्री रामप्यारी बाई सारडा कन्या विद्यालय मुख्याध्यापिका, श्रीमती वृषालीताई तूप साखरे, तूप साखरे लॉन्स च्या संचालिका सौ. अर्चना मानकर – मानकर बॅग हाऊस च्या संचालिका , सौ. सुनीता शिंपी- महिला अध्यक्ष क्षत्रिय आहेर शिंपी समाज, सिडको डॉ.सुमीती कौर पाटील, स्त्री रोग तज्ञ – ॲड. प्रेरणा साळुंखे- माजी अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण आयोग ॲड. अनिता जगताप तसेच राधिका फाउंडेशन कार्यकारणी सदस्य अध्यक्ष -श्री लाला ठक्कर उपाध्यक्ष – वंदना बनकर सल्लागार अध्यक्ष – कल्याणराव पाटील खजिनदार – श्री अनिल नहार सचिव – श्री जावेद शेख ब्रँड अँबेसिडर – हर्षाली भोसले मखमलाबाद शाखाध्यक्ष – श्री संदीप काकड बागलाण शाखा अध्यक्ष -श्री अरविंद सोनवणे निफाड शाखा अध्यक्ष श्रीमती जयश्री भटेवरा, पत्रकार डॉ. श्री शाम जाधव आणि, डॉ. अशोक बन्सी पगारे, पंचवटी वाझट परिवार , प्रकाश काळे विनोद जैन, व राधिका फाउंडेशन अंबड शाखा पदाधिकारी अंबड शाखा अध्यक्ष सौ. गायत्री लचके उपाध्यक्ष सौ. सुनीता केदारे सचिव सौ. अर्चना दिंडोरकर संघटक सौ. आशा ताई सोनवणे कार्यध्यक्ष सौ. हर्षदा भावसार सह कार्याध्यक्ष सौ. कविता नवाळे ई. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबड शाखा सचिव सौ. अर्चना दिंडोरकर, सौ. छाया परेवाल आणि राजश्री भावसार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक कार्यक्रमाच्या आयोजक सौ. गायत्री लचके तर राधिका फाउंडेशन चे उद्दिष्ट आणि त्या संदर्भाची संपूर्ण माहिती श्री सुरेश चव्हाण यांनी दिली.
कार्यक्रमा दरम्यान मार्गदर्शन करताना मा. यावेळी आमदार सौ. सीमाताई हिरे राधिका फाउंडेशनची संस्थची शाखा या भागात सुरू झाल्याने या भागातील महिलांना विद्यार्थ्यांना गरजू व्यक्तींना योग्य ती मदत वेळेत मिळेल, महिलांसाठी खुले व्यासपीठ मिळेल, सामाजिक कार्य या भागात पण सुरू राहतील, अशा सर्व उद्दिष्टांनी परिपूर्ण अशा अंबड शाखेचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे अशी भावना व्यक्त केली. सीमाताई यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ चेतना ताई या आधुनिक युगाची सावित्रीबाई फुले आहे
प्रसंगी आमदार सीमाताई म्हणाल्या शाखेच्या अनावरण त्यांनी राधिका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चेतनाताई सेवक तसेच अंबड शाखा अध्यक्ष सौ. गायत्री लचके यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या शाखेसाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमात सुधाकर आय क्लिनिक, व अशोका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर प्राजक्ता जठार आणि डॉक्टर हर्षदा तळेगावकर यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले त्याचाही लाभ उपस्थित महिलांमधून सर्वांनी घेतला आणि त्यासाठी आभार देखील व्यक्त केले. महिलांसाठी छान असा उखाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला वेगवेगळ्या स्पर्धंचे नियोजन झाले. लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीसे उपस्थित महिलां मधून देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सिडको अंबड परिसरामधून मालती सोनवणे, जयश्री चौधरी, स्वाती खर्डे, कविता सोनवणे, रुक्मिणीबाई सुबंध, कलपना शिंपी, रोहिणी गायकवाड, राजश्री भावसार, पुनम गायकवाड, भारती जाधव, रेखा काळे, लता थोरात, कोमल धोंडगे, रोहिणी सोनार, फरझाना शेख, सुरेखा मैंद, रेखा काकड इत्यादी महिला उपस्थित होत्या.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















