
🔴 वाल्मीक कराड चं नाव घेऊन सांगतोय… मुख्यमंत्री विधानसभेत थेटच सांगितलं.
शिवगर्जना न्यूज नागपूर,
नागपूर : बीड मधील मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस एसपी ची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा सभागृहात केली. मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना थेट वाल्मिक कराडचे नाव घेत कारवाईचा शब्द दिला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. वाल्मिक कराड हा प्रकरणाचा मास्टर माईंड असून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे याच्या सोबत त्याचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
▪️वाल्मिक कराड बद्दल मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाळे मुळे खणून काढणार असून मास्टर माईंड कोणीही असून त्याला शिक्षा होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, वारंवार वाल्मिक कराडचे नाव घेतलं गेलंय, त्यामुळे सांगतो की , या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. वाल्मिक कराड याचा संबंध कुणा सोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वां सोबत आहेत. आमच्या सोबत, पवार साहेबां सोबत ही फोटो आहेत. तो कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, त्याचा विचार न करता कारवाई करण्यात येणार आहे. एका प्रकरणात तो आरोपी आहे, त्यात कारवाई होणाच, पण या प्रकरणात पुरावे मिळाल्यानंतर त्याला सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनात काय म्हटले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत परभणी हिंसाचार आणि बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन सादर केले. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मस्साजोगचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं प्रकरण नाही. याची पाळेमुळे खणावी लागतील. एव्हाडा एनर्जी यांनी बीड मध्ये पवन चक्की मध्ये गुंतवणूक केली आहे. यातून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार सुरू आहे.
अशोक घुले, नारायण घुले. प्रतिक घुले असे आरोपी दुपारी तिकडे गेले. तेथील वॉचमनला मारहाण केली. पीडितांनी सरपंचांना फोन केला.आरोपी बाजूच्या गावचे होते. देशमुख आणि अन्य काही जण तिथे पोहचले. त्यांना चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. ९ डिसेंबर रोजी संतोष अण्णा चार चाकी वाहनातून गावी परत जात असताना ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले. त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले आणि स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.
सरपंच यांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. १५ ते २० मिनिटांत सोडतो असे सांगत होता, पण सोडले नाही. प्रचंड मारहाण केली त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, डोळ्यावर मारहाण करुन निर्घृण हत्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटले.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















