16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️दिव्यांग व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी साखळी पध्दतीने आमरण उपोषण.

🔴 दिव्यांग व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी न्याय मिळेपर्यंत साखळी पध्दतीने आमरण उपोषण दि. २०/१२/२०२४ रोजी वेळ सकाळी ११.०० वाजता सुरुवात.

शिवगर्जना न्यूज, 

मुबंई प्रतिनिधी : दीपमाळा मोकळ

मुबंई : महाराष्ट्र राज्यातील दिव्यवांग बांधवांना शासकीय योजने पासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे दिव्यांग आधार संघ संघटने मार्फत आझाद मैदान मुंबई येथे दिव्यांग व्यक्तींना अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना मिळत असलेले पगारीचे मानधन पुरेसे होत नाही म्हणून यामध्ये फेरबदल करुन १५०० /- हून हे मानधन ६,००० /- पर्यंत करण्यात यावे. दिव्यांगाचे मा. बच्चुभाऊ कडू यांना दिव्यांग मंत्रालय येथे अध्यक्षपदी घेऊन निवड करण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींना विना अट रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्यात यावे. दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी जागा, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत येथे दिव्यांगाचा राखीव ५ ℅ निधी तसेच दिव्यांग स्वतंत्र दिन डिसेंबर पूर्वी तात्काळ वाटप करण्यात यावा. उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शासकीय फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची नसावी व विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मंजुर करण्यात याव्यात. व इतर प्रमुख मागण्या संदर्भात या विषयावर आमरण साखळी उपोषण करण्यात येणार आहे. करीता मा. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयांवर विचार पूर्वक दिव्यांग व्यक्तींना न्याय द्यावा असे निवेदनाद्वारे कळविले आहे. 

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞

(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या