
🔴 राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केले परभणी घटनेचा निषेध.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्र. : निळकंठ जाधव
राष्ट्रीय चर्मकार महासंघ नायगांव च्या वतीने परभणी येथे संविधान स्तंभाची अवमान व तोडफोड करणाऱ्या समाजकंटकास अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत निषेध केला.
दिनांक १०/१२/२४/ रोजी परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोरील संविधान स्तंभाची तोडफोड करीत अवमान करणाऱ्या समाजकंटकास अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी शुक्रवारी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र जिल्हा नांदेड ता. नायगांव वतीने मा. तहसीलदार व पोलीस स्टेशन नायगाव येथे निवेदन देण्यात आले.
सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून या निषेध मोर्चात मध्ये सामील झाले यावेळी उपस्थित समाज बांधव राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे व प्रसिद्धी प्रमुख नागेश भालके शिवाजी हवेलीकर सय्यद आजाद शेठ विठ्ठल गंगासागरे रामचंद्र रोडे संदिप कांबळे ईतर समाज बांधव उपस्थित होते.















