16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात वसंत पाटील सुगावे यांनी घेतली पत्रकार परिषद

🔴 घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात वसंत पाटील सुगावे यांनी घेतली पत्रकार परिषद भव्य कार्यक्रमाचे सांगितले स्वरूप. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव 

नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त पत्रकार परिषद आयोजित दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी १ वाजता आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, घुंगराळा येथील खंडोबा रायाची यात्रा मोठया प्रमाणात साजरी व्हावी म्हणून आम्ही समस्त गावकरी दर वर्षी प्रयत्न करीत आहे

तालुक्यातील घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा ही ही जिल्ह्यातील माळेगाव यात्रे नंतर घुंगराळा येथील यात्रा दुसऱ्या क्रमांकावर भरत असल्यामुळे घुंगराळा यात्रेसाठी कला महोत्सवा बरोबर पशु प्रदर्शन व या वर्षी घोडा प्रदर्शन व कुस्त्याची दंगल व पालखी सोहळा मोठया थाटात साजरा दरवर्षी होते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले. 

घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे, रामप्रसाद चन्नावार, गोविंद नरसीकर, शेषराव खंदारे, गंगाधर गंगासागरे, अनिल ढवळे, देविदास जेटेवाड, चंद्रकांत सूर्यतळ, बालाजी शेवाळे, निळकंठ जाधव, शेळगावकर संदीप कांबळे, मारोती कोपंलवार आदी यावेळी उपस्थित होते. 

खंडोबा यात्रेच्या निमित्ताने घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात वसंत पाटील सुगावे यांनी घेतली पत्रकार परिषद भव्य दिव्य कार्यक्रमाचे सांगितले स्वरूप सांगितले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या