16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️तालुक्यातील शेतकऱ्यांसह गोरठेकर यांच्या उपस्थितीत तहसिलदार यांना निवेदन

🔴 तालुक्यातील शेतकऱ्यांसह गोरठेकर यांच्या उपस्थितीत तहसिलदार यांना निवेदन.                  

शिवगर्जना न्यूज, 

उमरी प्रतिनिधी 

उमरी : शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचं चित्र तालुक्या सह विधानसभा मतदार संघात सर्वत्र पहावयास मिळत आहे. गंगापट्टी सह बोथी तुराठी, बितनाळ, मोखंडी, गावासह सर्व उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके संपूर्णतः आलेल्या पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे सर्वत्र शेत शिवारात पाणी शिरले होते. सोयाबीन, कापूस, ज्वारी आदी पिकांचे १००% नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सरकारने अटी आणि शर्ती न लावता डोळ्यासमोर असलेल्या परिस्थिती च्या आधारे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रतिनिधी सह शेतकरी च्या ं उपस्थितीत यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शिरीष गोरठेकर व डॉ माधव विभुते व सर्व शेतकरी बांधवासह तहसिलदार मा.प्रशांत थोरात यांना देण्यात आले व त्यांना सुचना करण्यात आली. की तात्काळ शेतकऱ्यांना सरसगट मतद जाहीर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या