16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️छावा संघटना देगलूर (ग्रामीण) तालूका अध्यक्ष पदी रमेश पाटील यांची नियुक्ती.

 🔴 छावा संघटना देगलूर (ग्रामीण) तालूका अध्यक्षपदी रमेश पाटील यांची नियुक्ती.

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी (९९२३०७२२४२) 

देगलूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश तेजेराव पाटील वन्नाळीकर मागील वीस वर्षांपासून अ.भा. छावा मराठा युवा संघटनेचे चे सामाजिक काम अविरतपणे व प्रामाणिकतेने काम करत असून त्यांच्या या निरंतर कार्याची दखल घेत आज कुसुम सभागृह नांदेड येथे छावा च्या संवाद दौरा कार्यक्रमात छावाचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या हस्ते देगलूर तालूका अध्यक्ष पदी रमेश पाटील वन्नाळीकर नियुक्ती करण्यात आले.

यावेळी छावाचे केंद्रिय उपाध्यक्ष भिमराव भाऊ मराठे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांसह संभाजी बिग्रेड देगलूर तालुकाध्यक्ष माधव पाटील केरुरे, उमेश पाटील आडलुरकर, श्रीनिवास अंकमवार, रमेश दोसलवार, चेतन पाटील, अनेक जयराज पाटील, मारोती जुरावाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दरम्याण रमेश पाटील वन्नाळीकर यांच्या निवडीचे नांदेड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी स्वागत करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या