19.3 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️भारतिय मराठा महासंघ पद नियुक्ती सोहळा.

🔴 भारतिय मराठा महासंघ पद नियुक्ती सोहळा. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी : (९९२३०७२२४२) 

०३/०९/२०२४ रोजी लोकनिधी अर्बन सोसायटी देगलूर येथे छत्रपति शिवाजी महाराज यांचे पूजन व दिप प्रज्वलन करून डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गायन करून मानवंदना देऊन थाटात पार पडला. राष्ट्रीय उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे यांच्या मार्गदर्शना प्रमाणे सुधाकर जबडे, डॉ. सुनील जाधव, सोशल मीडिया तालुका प्रमुख शहाजी वरखिंडे, यांच्या उपस्थिती मध्ये युवा अध्यक्ष मराठवाडा विभाग पदी संतोष एकनाथराव पा. थडके देगावकर यांची नियुक्ती झाली. चेतन रणजीतराव घरडे यांची युवा तालुकाध्यक्ष देगलूर, -बालाजी व्यंकटराव हाडोळे यांची युवा तालुका उप अध्यक्ष देगलूर, राजेश प्रकाशराव पाटील युवा तालुका सचिव देगलूर, अवधूत नीलकंठराव शिंदे यांची देगलूर युवा तालुका उपाध्यक्ष सोशल मीडिया तर ज्ञानेश्वर हणमंतराव हसनाळे यांची मुखेड युवा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली. सर्वाना जयदिप वरखिंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. 

डॉ. सुनील जाधव यांनी प्रास्ताविक सादर केले. संतोष पा. थडके यांनी सामाजिक कार्य धडाडीने करून अनेक अडचणी, प्रश्न, समस्या सोडवण्याचा मानस आहे तो पूर्ण करून आदर्श कार्य करू असे प्रतिपादन केले. नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून उत्क्रुष्ट सामाजिक कार्य करण्याची ग्वाही दिली. अध्यक्ष स्थान सुधाकर जबडे यांनी भूषवले. जयदीप वरखिंडे यांनी पदाधिकाऱ्यांना भावी कार्या बद्दल दिशा दर्शन करून विस्त्रुत मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संखेने महिला भगिनी व बांधवांची उपस्थिती होती शेवटी आभार संपादक शिवगर्जना न्यूज, शहाजी वरखिंडे यांनी मानले. 

सुत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले व शेवटी भारतिय संविधान गीत गायन केले व सोहळ्याची सांगता झाली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या