25.5 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️उच्य न्यायालयाच्या आदेशा नंतर देगलूर येथील जुन्या एसटी बसस्थानक नूतनीकरण कामास सुरुवात.

🔴 उच्य न्यायालयाच्या आदेशा नंतर देगलूर येथील जुन्या एस.टी. बसस्थानक नूतनीकरणाच्या कामास  सुरुवात. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी (९९२३०७२२४२) 

देगलूर शहर तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमे लगत असलेले शहर आहे. सीमावर्ती भागातील अनेक प्रवासी या बस स्थानकातून रोज प्रवास करतात, शहरातील जुन्या बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाल्याने प्रवाशांना मूलभूत सुविधां पासून वंचित राहावे लागत होते. बस स्थानक नूतनी करणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ७८ लाख रुपयाचा निधीही मंजूर करण्यात आला होता मात्र गुत्तेदाराकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात केले गेले नाही. गुत्तेदारकडून जलद गतीने नूतनी करणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी बालाजी मैलागिरे व धनाजी जोशी यांनी गेल्या वर्षभरा पासून अनेक वेळा संबंधित विभागाला अर्ज विनंती करून काम पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली होती परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे त्यांच्या अर्जाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी ऍड. शिवानंद टेकवाड तमलूरकर यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती सदरील याचिकेवर सुनावणी न्यायमूर्ती आर.व्ही. घुगे व न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे याच्या समोर सुनावणी झाली असता दोन्ही बाजुचा उक्तीवाद ऐकून सदरील नूतनीकरणाचे काम गुत्तेदाराने वेळेत पूर्ण करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अपिला अर्थी बालाजी मैलागिरे व धनाजी जोशी यांची बाजू ऍड.शिवानंद टेकवाड यांनी मांडली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या