🔴 भव्य नागरी सत्कार समारंभ, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे समाजभुषण पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आव्हान — तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप गवई.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
सांगली मेहकर : तथागत बहुउद्देशीय संस्था, मेहकर (रजि. नं. महा. ७९ / २०२० एफ १८६५४) बुलढाणा द्वारा आयोजित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना (ऑल इंडीया कार्यरत), राजमाता माँ.जिजाऊ महिला स्वयंम सहाय्यता बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्या मधुन प्रत्येक जिल्ह्यातील कर्तृत्ववान पुरुषांचा व महिलांचा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णा भाऊ साठे समाज भूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केली आहे. आपला प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख ३०/सप्टेंबर २०२४आशी आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्या मधुन सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकिय, प्रशासकीय, पत्रकारिता, (वृत्तपत्र इलेक्ट्रोनिक / डिजिटल मीडीया) युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रामध्ये चांगले कार्य करणाऱ्या पुरष, महिला तसेच युवक, युवतींना प्रोत्साहन देण्याच्या उपदेशाने हा पुरस्कार सोहळा राबविण्यात येणार आहे. मेहकर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार या
पुरस्कारांचे गाव पातळीवर वितरण होणार आहे. यामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पंचरंगी दुपट्टा, महामानवांच्या विचारातील एक सुंदर पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासाठी इच्छुक सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकिय, प्रशासकीय, पत्रकारिता, (वृत्तपत्र इलेक्ट्रोनिक / डिजिटल मीडीया) युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशा गुणीजनांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण व जेष्ठ नागरिक, माजी सैनिक यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी आपला प्रस्ताव तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई तथागत ग्रुप संपर्क कार्यालय- मिलिंद नगर वार्ड नं १९ मेहकर ता. मेहकर जिल्हा बुलढाणा येथे यांच्याकडे सादर करावा. किंवा खाली दिलेल्या व्हॉटसप मोबाईल क्रमाकांवर ९९७०४६७१४१ पाठवून द्यावा व संपर्क साधावा. त्या अनुषंगाने सामाजिक कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान सामाजिक क्षेत्रातील पुरुष, महिलांनी तसेच युवक युवतीनी आपला कार्य अहवाल पाठवावा. व नागरी सत्कार समारंभासाठी जेष्ट नागरिकांनी व माजी सैनिकांनी आपले नांव नोंदणी करुन घ्यावे. असे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई यांच्याकडे सादर करण्याचे आव्हान यांनी केले आहे.