🔴 आंतरगाव येथील लाईनमॅन श्री.मोरे यांना विजबिल वसुली करत आसताना ग्राहकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने कुंटुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव तालुका ग्रा. प्रतिनिधी:दिपक गजभारे
कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे अंतरगाव येथील गावातील लाईनमॅन हे आपले कर्तव्य बजावत असताना गावातीलच एक नागरिक यांनी सदर लाईनमॅन वीज वसुलीसाठी गेले असता कॉलर पकडून धक्काबुकी करूत जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केले असे गुन्हे लावत सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. रवी कुमार शंकरराव मोरे वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण शाखा कुष्नूर येथे कार्यरत असून त्यांच्याकडे अंतरगाव आणि इतर दोन गावाचा पदभार आहे येथील विद्युत केंद्र तपासणे वीज बिल वसुली करणे थक बाकीदार ग्राहकाचा विज पुरवठा खंडित करणे अशा इत्यादी कामे सोपविले आहेत. दि. ३०/०८/२०२४ रोजी सकाळी नऊ ०९ च्या सुमारास वीज बिल वसुली करीत असताना श्री.पांडुरंग हौसाजी शिंदे, हे माझ्या जवळ येऊन तू पैसे कशाचे मागतोस जमा करतोस, याची पावती कुठे आहे, तुझ्या साहेबाला घेऊन गावात ये असं म्हणत माझे कॉलर पकडून माझा हात मुरगाळून मला धक्काबुकी केली, जर पुन्हा गावात आला तर तुला बघून घेतो अशी धमकी पण दिली. या वरून सदर लाईनमन मोरे यांनी पांडुरंग हौसाजी शिंदे यांच्यावर नियमा नुसार योग्य ती कारवाई करा अशी तक्रार केली आहे त्यांच्या तक्रारी वरून कुंटूर पोलीस ठाणे येथे सदर आरोपी विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर भारतीय दंड न्याय संहिता कलम १३२ ११५ (२), ३५१ (२) ३५२अशा शासकीय कामात अडथळा करणे, शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणे अशा विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांच्या मार्फत हे करत आहेत.