🔴 रवींद्र चव्हाण यांना खासदार करणे हीच स्व.खा.वसंतराव चव्हाण यांना खरी श्रद्धांजली — युवा सेना उपजिल्हाप्रमुख
शिवगर्जना न्यूज,
उमरी तालुका प्रतिनिधी : महेश पडोळे
यंदाची लोकसभेची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होती आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला ते भाजप मध्ये गेले त्यामुळे काँग्रेसचा बालकिल्ला असणाऱ्या नांदेड मध्ये अटी तटीची लढाई झाली. अशा परिस्थितीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कडून स्व वसंतराव चव्हाण यांनी निवडणूक लढवली. तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला आणि नांदेड जिल्हात महाविकास आघाडीचा गड राखला. त्यांच्या या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की नांदेड जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण म्हणत होते की नेते गेले म्हणून काय झालं या नांदेड ची जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे हे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान सिद्ध करून दाखवले. परंतु त्यांच्या या आकस्मित निधनाने संपूर्ण नांदेड जिल्हा पोरका झाला आहे साहेबांच्या जाण्याने ही पोकळी भरून निघणार नाही परंतु त्यांचा वारसा चालवण्यासाठी प्रा .रवींद्र चव्हाण हे सक्षम आहेत स्व. खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचे प्रतिरूप म्हणून आम्ही त्यांना साथ देणार तसेच आगामी लोकसभा पोट निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना खासदार करूनच साहेबांना खरी श्रद्धांजली देणार असे युवासेना नांदेड उप जिल्हाप्रमुख सुरेश पाटील ढगे इज्जतगावकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.