🔴 एका रात्रीत नोटबंदी, एका रात्रीत लॉकडाऊन, एका रात्रीत सरकार बदलते मग नराधमाला एका दिवसात फाशी का होऊ शकत नाही.
▪️डोंबिवलीत गणपती आगमन सोहळ्यात महिलांच्या हाती बॅनर.
शिवगर्जना न्यूज,
डोंबिवली (मुंबई) प्रतिनिधी : (दीपमाला मोकळ)
बदलापूर शहरात एका चिमुकलीवर लैगिक अत्याचाराच्या घटनेनेनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करत बदलापूरकरांनी तब्बल दहा तास रेल्वे रोको आंदोलन केले होते. राज्यात संतापाची लाट उसली असताना डोंबिवली तील महिलांनी संताप व्यक्त केला. एका रात्रीत नोटबंदी, एका रात्रीत लॉकडाऊन, एका रात्रीत सरकार बदलते मग नराधमाला एका दिवसात फाशी का होऊ शकत नाही. असे बॅनर डोंबिवलीत गणपती आगमन सोहळ्यात महिलांच्या हाती घेतले होते. गजानन ढोल ताशा पथकातील महिलांनी असे बॅनर लावून संताप व्यक्त केला. सरकार पर्यत आपले म्हणणे पोहोचविण्या करीता या सोहळ्यातून महिला अशा प्रकारचे बॅनर हाती घेत असल्याचे दिसते.