19.7 C
New York
Thursday, June 4, 2026

Buy now

spot_img
spot_img

मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या देगलूर बंद.

देगलूर: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षण मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर तेथील पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अमानुष लाठी चार्ज केला गेला. याविरोधात सखल मराठा समाज देगलूर तर्फे ४ सप्टेंबर २०२३ रोज सोमवार रोजी देगलूर बंदची हाक पुकारली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा तरुण, महिला, वृद्ध, लहान मुले हजारोंच्या संख्येने अंतरावली सराटी या गावी मागील चार दिवसापासून उपोषणाला बसले असताना दि. १ सप्टेंबर रोजी अचानक पोलिसांचा मोठा ताफा
आला आणि त्यांनी अचानक हल्ला चढविला. त्यांच्या या अमानुष हल्यामध्ये महिला, तरुणांची डोके फुटली व यावेळी अश्रू धूराचे नळकांडे सोडण्यात आले. आंदोलन दडपण्याचे प्रयत्नात शांततेत चालू असणारे हे आंदोलन अचानक पेटले शेवटी नको होते तेच झाले. या घटनेचा अनेक ठिकाणी निषेध होत आहे. सकल मराठा समाज सरकारवर नाराज असून, जालना जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे. ५४ पेक्षा जास्त लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने शांततेत काढून जगभरात नाव केले. पण या लाठीचार्जमुळे शांततेत होत असलेल्या आंदोलनाला कुठेतरी चिघळण्याचे प्रयत्न केल्या गेले. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागले. याच अनुषंगाने देगलूर येथे मराठा समाजाने तातडीची बैठक बोलावून दि. ४ सप्टेंबर २०२३ रोज सोमवार रोजी सकल मराठा समाज तर्फे देगलूर बंदची हाक देण्यात येणार असून या बंदला तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, व्यापारी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य करावे अशी सकल मराठा देगलूर तालुका समाजातर्फे आव्हान करण्यात आले आहे. तसेच झालेल्या घटनेतील दोषींवर त्वरित कार्यवाही झाली नाही तर सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा उपजिल्हाधिकारी व पोलीस स्टेशन देगलूर येथे निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी देगलूर शहरातील व तालुक्यातील सर्व मराठा बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या