17.4 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️भारतीय जनता पार्टी व नरेंद्र पवार फाऊंडेशन तर्फे दहावी व बारावी विध्यार्थ्यांचा गुण गौरव.

🔴 भारतीय जनता पार्टी व नरेंद्र पवार फाऊंडेशन तर्फे दहावी व बारावीच्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव

▪️टिटवाळा आणि कल्याणमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा केला सन्मान. 

▪️तज्ञ मंडळींनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. 

शिवगर्जना न्यूज, 

मुंबई (डोंबिवली) प्रतिनिधी : दीपमाला मोकळ 

भारतीय जनता पार्टी व नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या वतीने टिटवाळा आणि कल्याणमध्ये दहावी व बारावीच्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी सुमारे ८० शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांचा सन्मान करत तज्ञ मंडळींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. गुणवत्ता विद्यार्थ्यांना पेन, पेनड्राईव, पाण्याची बाटली, फाईल फोल्डर तसेच प्रमाणपत्र व शिक्षकांना सन्मानचिन्हे तर पालकांना तुळशीचे रोप देवुन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या हर घर तिरंगा, घर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी, पालक व शिक्षकांना तिरंगा भेट देण्यात आला. 

टिटवाळा येथील अशोका सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मोहने टिटवाळा मंडळातील प्रत्येक शाळेतील तसेच काॅलेज मधील पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी ठाणे कारागृहाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजाराम भोसले, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर, परेश गुजरे, मनिषा केळकर, रमेश कोनकर, शशिकांत पाटील, संतोष शिंगोळे, किरण रोठे, दिपक कांबळे, प्रतिक्षा बारलो, यशोदा पाटील, समीर दलाल, अजय मिश्रा, शैलेश देशपांडे, हेमंत गायकवाड, भिका पाटील, शैलेश शेट्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाणे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजाराम भोसले यांनी सांगितले की, सध्याची वेळ फार वाईट आहे. मोबाईल जेवढा चांगला व तेवढा वाईटही आहे. मोबाईल हाताळतांना योग्य रितीने हाताळणे गरजेचे आहे. तसेच आणखी एक महत्त्वाचे म्हणजे मुलांनी किंवा मुलींनी संगत चांगली ठेवा, वाईट संगतीमुळे अनेक वाईट गोष्टी घडतात. आईवडीलांचा आदर ठेवला पाहिजे त्यांचे ऐकले पाहिजे. शिकायचे वय आहे त्या वयातच शिक्षण घेतले पाहिजे असे भोसले यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या पाठीवर आई वडील कौतुकाची थाप देत असतात परंतु ज्या वेळेस सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान होतो त्या वेळेस त्यांची जबाबदारी वाढते. हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा मुख्य हेतू व उद्देश आहे. यामुळे आणखीन चांगल्या प्रकारे गुण मिळवले पाहिजेत म्हणून विद्यार्थी परिश्रम घेतात. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रश्न संच उपलब्ध करून दिला जातो, तसेच शैक्षणिक मदत केली जाते असे पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश पोखरकर यांनी केले तर सुत्रसंचालन यशोदा पाटील यांनी केले.

तर कल्याण पश्चिमेतील के. सी. गांधी शाळेत आयोजित कार्यक्रमात शिक्षण तज्ञ बिपिन पोटे आणि देवेंद्र ताम्हाणे सर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. या दोन्ही कार्यक्रमात लकी ड्रॉ काढून स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच, एअरफोन भेटवस्तू म्हणून देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आत्माराम उर्फ बाबा जोशी, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मंगल वाघ, सचिव प्रिया शर्मा, कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे, जिल्हा अनुसूचीत जाती जमाती अध्यक्ष अनिरुध्द जाधव, विवेक वाणी, अनिल चौधरी, हेमा पवार, प्रिती दीक्षित, ज्योती भोईर, निता देसले, सदा कोकणे, श्याम मिररकुटे, प्रताप टूमकर, भगवान म्हात्रे, रवी गुप्ता, हेमंत परांजपे, जमशेद खान, संजय कारभारी, कल्पना पिल्ले, रेखा तरे, समृध्दी देशपांडे, सागर जोशी, दर्शन गुडदे, वसीम काझी, आत्माराम फड, गिरीष धोकीया, राजेश रजक आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या