🔴 मराठा जनजागृती शांतता रॅलीचा समारोप.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक जि. प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव
नाशिक आज दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी मराठा जनजागृती शांतता रॅलीचा समारोप व सभा श्री मनोज दादा जारांगे पाटील यांच्या उपस्तीत नाशिक शहरात असल्याने नाशिक पोलीस यांच्या मार्फत नाशिक शहरातील मार्गात काही बदल करण्यात आले आहे प्रवेश बंद मार्ग.
१) स्वामीनारायण चौक ते कन्नमवार पुलापर्यंत सर्व वाहनांना नाे एन्ट्री.
२) मिर्ची हॉटेल सिग्नल ते स्वामीनारायण चाैक.
३) संतोष टी पॉईंट ते दिंडोरी नाका ते मालेगाव स्टॅण्ड.
४) रविवार कारंजा – सांगली बँक सिग्नल – मेहेर सिग्नल ते सीबीएस (दोन्ही बाजूकडील मार्गांवर प्रवेश बंद माेर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी येथे पार्किंग.
◼️संभाजीनगर रोडकडून येणारी वाहने निलगिरी बाग.
◼️पेठरोड-दिंडोरीरोडकडून येणारी वाहने पेठराेडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड.
◼️घोटी- इगतपुरी, मुंबईकडून येणारी वाहने महामार्ग बसस्थानकाशेजारील मोकळी जागा.
◼️त्र्यंबकरोडकडून येणारी वाहने गोल्फक्लब मैदान.
◼️गंगापूर गावाकडून येणारी वाहने डोंगरे वसतिगृह मैदान व मराठा विद्याप्रसारक कॉलेज‘पर्यायी मार्ग’ वापरा.
◼️ छ. संभाजीनगरकडून मिर्ची सिग्नल-अमृतधाम-तारवालानगर सिग्नल-मार्केट यार्ड-पेठराेडमार्गे पुढे.
◼️धुळ्याकडून येताना अमृतधाममार्गे तारवालानगर सिग्नल- मार्केट यार्डकडून पेठराेडने शहरात एन्ट्री दिंडोरी नाक्याकडून पेठ नाका- मखमलाबाद नाका-रामवाडी पुल.
◼️दिंडोरी नाक्याकडून बाहेर जाणारी वाहतूक तारवाला चौक -हिरावाडी मार्गे.
◼️व्दारका सर्कलकडून कन्नमवार ब्रीजकडे पुलाखालून जाणारी वाहतूक व्दारका उड्डाण पुलावरून जाईल.