🔴 भव्य एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : किशोर शिरसाट
नाशिक आज दिनांक.१०/८/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृह येथे नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक यांची १५ ऑगस्ट दिना निमित्ताने नाशिक मनपा कार्यरत सुरक्षा रक्षक एकूण ३० ते ३५ सुरक्षा रक्षकांचा ताफा यांची परेड व कवायत नाशिक महानगरपालिकेचे हवालदार साहेब श्री. जाधव साहेब यांनी परेड व कवायत ची कमान दिली. व दोन अडीच तास घेण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी सलामी देतांना परेड कोणत्या पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व नाशिक म.न.पा. सुरक्षा रक्षक अधिकारी एस.टी. दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली परेड व कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या परेडसाठी सुरक्षा रक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभागी झाले होते.