🔴 ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव ग्रा.ता.प्रतिनिधी : दिपक गजभारे
नायगांव, शहरापासून जवळच असलेल्या ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल खैरगाव येथे आज दि.०९/०८/२०२४ रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला, कार्यक्रमांची सुरुवात बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सरोजा धरणे उपस्थित होत्या. अशोक सर यांनी आदिवासी दिनाविषयीची माहिती सांगितली यावेळी शाळेच्या शिक्षिका आशा अडबलवार, स्नेहा मिस याही उपस्थित होत्या. या निमित्त शाळेच्या चिमुकल्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केले.