
🔴 आशा वर्कर सेविका यांचा उपक्रम बाळाचे संगोपन.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : श्याम जाधव
देवळाली कॅम्प आज दिनांक ०५/०८/२०२४ रोजी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल एकदिवसीय कार्य शाळा आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. स्वाती मॅडम, डॉ. जयश्री पाटील मॅडम, डॉ. कुमावत मॅडम, डॉ. हुंडाराव मॅडम देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल च्या परिचारिका व नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र शिगवे बहुला मेडिकल ऑफिसर जयश्री पाटील कार्यक्रम सहाय्यक नीता गरुड आरोग्य सेविका, मनीषा गोसावी, नयना डावखर व आशा वर्कर स्वयंसेविका २५ अशा सेविकांनी नाट्यपथक सहभागी झाल्या होत्या सुजाता अहिरे, कविता पाळदे, आरती डांगे, अलका गोडसे, सविता गीते, अर्चना पगारे, अनिता गोसावी व आरती उन्हवणे आदी आशा सेविका यांनी सहभाग घेतला होता. आशा सेविका यांना विविध प्रकारचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले गीत गाण्यांतून शब्दाची आतिषबाजी करूत बाल संगोपन कसे करावे, या माध्यमातून डॉक्टर यांचे चांगले मार्गदर्शन लाभले लहान बाळाची कशी काळजी घ्यावी या प्रसंगी प्रत्यक्ष कृतीही करून दाखविली.















