
🔴 श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक.
संस्थापक आध्यक्ष डॉ चेतना ताई सेवक यांच्या मार्गदर्शनाने व डॉ संदीप काकड यांच्या संकल्पनेने शालेय विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : श्याम जाधव
नाशिक मखमलाबाद आज दिनांक दि. ०२ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था तर्फे मखमलाबाद येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक – २ आंगणवाडी क्र. ०५ येथे बालगोपाल लहान मुले – मुली यांना पाटी व पेन्सिल बॉक्स व खेळाचे साहित्य चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी राधिका फाउंडेशन संस्थेचे शाखा आध्यक्ष व रुद्रा काउन्सलिंग सेंटर चे संचालक डॉ संदीप काकड, सौ रेखा काकड सदस्य उपस्थित होते.
सोबत मा. CDPO चंद्रशेखर पगारे सर मा.मुख्य सेविका विद्या मिसाळ, अंगणवाडी सेविका उज्वला खाडे, मदतनीस शोभा खिरोडे यांच्या उपस्थिती मध्ये शालेय वस्तू वाटप करण्यात आले. याप्रसंगी विध्यार्थी सोबत त्यांचे पालक ही मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ संदीप काकड यांनी उपस्थित पालक, शिक्षक व पदाधिकारी यांना राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था बद्दल माहिती व कार्याची रूपरेषा सांगण्यात आली. व सर्वांचे आभार व्यक्त केले. श्री राधिका फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी व अंगणवाडी च्या पाल्य व पालक उपस्थित होते.
आयोजक :- डॉ संदीप काकड राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक.















