
🔴 छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आचारसंहिता कारणामुळे झाकण्यात येवू नये. — हर्षवर्धन देशमुख
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्र. निळकंठ जाधव
आचार संहिते च्या कारणामुळे नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाकू नये अशी विनंती धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान नांदेड जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी नांदेड येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली.
ज्यावेळेस मागील आचारसंहिता लागू झाली त्यावेळेस आचार संहितेचे कारण लावून तिथे वेगवेगळ्या पक्षांचे चिन्ह आहेत असे, कारण देऊन प्रशासनाने निवडणूक आयोगाने नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्णतः झाकून टाकले होते तब्बल ०१ महिना २३ दिवस महाराजांचे स्मारक झाकून होते. परंतू याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान यांनी निवडणूक आयोगाला स्मारक झाकल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून शिव प्रेमींच्या रोशाला तुम्हाला सामोरे जावे लागेल अशी भावना त्यांनी तिथे व्यक्त केली.















