
🔴 काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी सौ.श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांची निवड.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी : ९२३०७२२४२
देगलूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी सौ. श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांची निवड झाली असून या निवडीचे सर्वञ स्वागत व अभिनंदन होत असून, सदरील निवड हे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले असून नवनिर्वाचित खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार व जिल्हाध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पञ देण्यात आले.
श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर हे उच्च शिक्षित, असून काँग्रेस पक्षातील निष्ठावान,पक्षनिष्ठ महिला पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख. उच्च शिक्षण घेऊन ही समाजकारण व राजकारणाची आवड असल्याने त्यांनी पदार्पण केले.
दरम्यान काँग्रेस पक्ष संघटन तळा गाळात वाढवण्यासाठी अतिशय तळमळीने निष्ठेने काम करत कार्यकर्ते जोडत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या सौ. श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांची काँग्रेस पक्षाच्या देगलूर तालुकाध्यक्ष पदी वर्णी लागल्याने तालूक्यातील राजकारण व समाजकारणातील कर्मचारी तथा महिला भगिनीं विशेष आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
दरम्यान सौ.श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांनी सतत सक्रीय पणे प्रामाणिक कार्य करत स्वकर्तृत्वावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करुन तालूक्यातील झुंजार महिला ठरल्या असून, विशेष म्हणजे श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांच्या रुपाने प्रथमच देगलूरकरांच्या इतिहासात महिलेला एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख पदावर काम करण्याचे मानाचं स्थान प्राप्त झाले आहे.
देगलूर तालुक्यासह खानापूर सर्कल मध्ये मागील १०-१५ वर्षाच्या दरम्यान सर्व निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्षाला प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यामध्ये सिंहांचा वाटा सौ.श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांनी उचलल्याचे उदाहरण सर्वपक्षीय नेत्यांच्या नेहमीच चर्चा होत असते.
दरम्यान लोकसभा रणधुमाळी आधी एकीकडे काँग्रेस पक्षाला देगलूरातील अनेक दिग्गज सोड चिठ्ठी देत भाजप प्रवेश करत असतांना, दुसरीकडे संकटात सुध्दा आपल्या काँग्रेस पक्षाशी सोबत राहत सर्व समान्यांना सोबत घेवून सक्रीय काम करत सौ.श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांनी नेतृत्व केलेल्या खानापूर सर्कल मध्ये देगलूर-बिलोली मतदार संघात सर्व सर्कल पेक्षाही जास्त मताधिक्य काँग्रेस ला मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले असून त्यांच्या या कार्य कुशलतेचा काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने दखल घेत महिला-पुरुष भेदभाव न करता एका पक्ष निष्ठ महिला पदाधिकार्यांस तालुक्याचे काँग्रेस कारभारी बनवल्याने विविध क्षेञातून काँग्रेसच्या महिला धोरणाचे व सौ.श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांच्या निवडीचे कौतूक होताना दिसत आहे. केवळ राजकीय वारसा म्हणून किंवा लोकप्रतिनिधी चा नातलग म्हणून संधी न देता आपल्या पक्षाच्या संकट काळात पक्षात सक्रीय राहून पक्षाला साथ देणार्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी दिले.
विशेष म्हणजे महिलांना पुढे करत राजकारणात कर्तृत्ववान महिलांना बळ देण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सौ.श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांना तालुका अध्यक्ष बसवून महिला सक्षमी करणांचा संदेश देऊन खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे देगलूर मधील अनेकांनी काँग्रेस जिल्हा नेतृत्वाचे व पक्ष श्रेष्ठींचे कौतूक करत आहेत. ही निवड म्हणजे जिल्ह्यातील आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान महत्व पूर्ण जात आहे.















