🔴 बँकेचे कर्मचारी पीक कर्जाचे कारण सांगून शेतकऱ्यांच्या खात्यास होल्ड.
शिवगर्जना न्यूज,
नायगाव प्र : दिपक गजभारे
◼️ बँक अधिकाऱ्याचा शेतकऱ्या प्रति अतिशय लाजिरवाणा प्रकार
टेंभुर्णी ता.नायगाव येथील एका शेतकऱ्याचा मुलगा शॉक लागून वारला असता त्याच्या शासन मदतीचे पैसे वारसदार म्हणून वडिलांच्या बँक खात्यात जमा झाले. शेतकरी आधीच मुलाच्या मृत्यूच्या दुःखात असताना बँक मॅनेजर ने त्या खात्याला होल्ड लावून शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केला. यावेळी युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बँकेत घातले ठिय्या आंदोलन.
♦️ सविस्तर, शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनेच्या माध्यमातून बँकेत पैसे जमा होत आहे पण त्याचा उपयोग शेतकऱ्याला वेळेवर घेता येत नाही. अशा अडचणी शेतकऱ्यांनी युवक काँग्रेसचे माणिक चव्हाण सांगितल्या बँकेचे कर्मचारी पीक कर्जाचे कारण सांगून अनेक शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावून शेतकऱ्याची अडवणूक करत आहेत. ही घटना टेंभुर्णी येथील शेतकरी नबीसाब सय्यद हे येऊन आपल्या शॉक लागून वारलेल्या मुलाची कैफियत बँक मॅनेजरने केलेली अडवणूक प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यापुढे मांडली अशा प्रकारच्या अनेक शेतकऱ्यांनी होल्ड बाबतीमध्ये वेळोवेळी आपल्या तक्रारी मांडल्या या सगळ्या तक्रारी लक्षात घेऊन नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष माणिक चव्हाण यांना बँकेत पाठवून या संदर्भात पाठवून शेतकऱ्याच्या मदतीच्या सूचना दिल्या. त्यावेळी युवा काँग्रेसचे माणिक चव्हाण यांनी अनेक शेतकऱ्यांसह बँक मॅनेजरचे दर्शन घडवून आणले. अशा एक नाही शंभर शेतकऱ्यांच्या खात्याला बँकेने होल्ड लावून त्यांची अडचण निर्माण करत आहेत हे लक्षात येताच माणिक चव्हाण यांनी बँक मॅनेजर ला जॉब विचारण्यासाठी बँकेतच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावण्याचा अधिकार आपणास कोणी दिला असा सवाल त्यांनी यावेळी विचारला शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावता येतो का? असा जी.आर. शासनाचा असेल तर आम्हाला द्या नाहीतर खात्याला गोल्ड लावून त्यांना जाणून अडचण निर्माण का करता या संदर्भातील माहिती द्या करीता बँकेत आंदोलनाला सुरुवात केली.
यावेळी रवींद्र पाटील चव्हाण बँकेत उपस्थित राहून या संदर्भात शेतकरी व बँक मॅनेजर यांच्या सोबत चर्चा केली, यावेळी बँक मॅनेजरला सूचना दिल्या त्यात शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावण्याचा अधिकार तुम्हाला नसून आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेत खात्याचे होल्ड काढण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्याच्या खात्याला जर होल्ड लावण्यात आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या सूचना रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत,
नायगाव मतदारसंघाचे आमदार याकडे लक्ष न देता मतदानाच्या हव्यासापोटी लोकांना देवदर्शन करून आणण्याची वारी सुरू केली आहे तर युवक काँग्रेसने अडचणीवर मात केले.
यावेळी काँ. नगरसेवक विठ्ठला आप्पा बेळगे, युवा काँग्रेस शहराध्यक्ष बंटी पाटील शिंदे, सुरज पाटील शिंदे, अजिंक्य पाटील, कल्याण विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष अभिजीत मंगरुळे, श्याम पाटील शिंदे, काळबा पाटील नरंगलकर, नाना पाटील नरंगलकर, सुमित पाटील जाधव, श्रीहरी पाटील सोमठाणकर, कैलास नारे, बालाजी झगडे, विजय गाडळे तसेच शेतकरी उपस्थित होते.















